Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन

दि . 06/08/2019

माजी परराष्ट्रमंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. त्यांना दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. स्वराज यांना किडनीचा आजार होता. 

प्रभावी व धडाडीच्या राजकीय नेत्या, वक्ता दशसहस्त्रेषु असे वर्णन केल्या जाणाऱ्या माजी परराष्ट्रमंत्री आणि  वरिष्ठ भाजप नेत्या सुषमा स्वराज यांना आज रात्री नऊ वाजता हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने नवी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली मात्र स्वराज यांचे रात्री साडेदहाच्या सुमारास आकस्मित दुःखद निधन झाले.

अडीच वर्षांपूर्वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्याने स्वराज यांच्या हालचालींवर मर्यादा आल्या होत्या मात्र त्यानंतरही त्यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री पदाची सूत्रे धडाडीने हलविली होती. दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री, सर्वात कमी म्हणजे केवळ 25 व्या वर्षी वयात हरियाणासारख्या राज्याच्या मंत्रिपदी विराजमान झालेल्या राजकीय नेत्या, अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी या दोन्ही भाजपसरकार यांच्या काळात मंत्रिपदी भूषवणाऱ्या त्या माजी विदेश मंत्री सुषमा स्वराज यांना आज संध्याकाळी हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना रात्री दहाच्या सुमाराला एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. 


ताज्या बातम्या