Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
गोदावरीच्या पुरात ६२ जणांना वाचवणाऱ्या SDRF ची रेस्क्यू टीम मालेगावाच्या मदतीसाठी सज्ज..

दि . 06/08/2019

मालेगाव शहरातील सर्व पूल पूल पाण्याखाली गेल्याने
रात्रीत पुन्हा पाऊस वाढण्याची शक्यता लक्षात घेता
पूर पाणी काही प्रमाणात कमी झाले असून.प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन साठी पूर पाण्यातुन लोकांना रेस्क्यू करण्यासाठी रेस्क्यू टीम मालेगावात.या टीम ने गोदावरीच्या पुरपाण्यात वाचवले ६२ जणांचे प्राण.

काल दिवसभर उगम स्थानात पाऊस सुरू असल्याने पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली होती.

सर्वत्र दिवसभर पावसाचाची संततधार सुरु होती. यासह गिरणा मोसम खो-यातील चणकापूर व हरणबारी,केळझर, ठेंगोडा या  धरण क्षेत्रात झालेल्या धुंवाधार पावसामुळे गिरणा व मोसम नदीतील पूरस्थिती कायम होती.

मालेगाव शहरातील सर्व पूल पूल पाण्याखाली पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली.पूरस्थिती कायम असल्याने शहरात आपत्ती परिस्थिती निर्माण झाल्याने रेस्क्यू टीम ला मालेगावात पाचारण करण्यात आले आहे.गेल्या दोन दिवसापासून नाशिकच्या गोदावरी नदीच्या पुर पाण्यात या टीम ने रेस्क्यू करत सायखेडा येथे ६२ जणांचे प्राण वाचवले होते.यावेळी त्यांनी सेल्फीचा मोह टाळण्याचे आवाहन या रेस्क्यू टीमचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत पारसकर यांनी सांगितले.


ताज्या बातम्या