Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
१९६९ नंतर पहिल्यांदा पूरपाणी मोसमपुलावरून ; शहरातील सर्व पूल पूल पाण्याखाली..

दि . 05/08/2019

शहरात दिवसभर उगम स्थानात पाऊस सुरू असल्याने पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली..  

रात्रीत पुन्हा पाऊस वाढण्याची शक्यता..
मालेगाव शहर व तालुक्यात रविवारी दिवसभर पावसाने दमदार हजेरी लावली. सर्वत्र दिवसभर पावसाचाची संततधार सुरु होती. यासह गिरणा मोसम खो-यातील चणकापूर व हरणबारी,केळझर, ठेंगोडा या  धरण क्षेत्रात झालेल्या धुंवाधार पावसामुळे गिरणा नदीतील पूरस्थिती कायम .

मालेगाव शहरातील मोसम आणि गिरणा नदीला आलेल्या पुराच्या पाणीत सायंकाळी सातच्या सुमारास वाढ झाल्याने नदी वरील रामसेतू पुलासह शरतील सर्व पुलंच्या वरून पाणी पूल पाणी गेल्याने शरतील नागरिकांची पाणी पाहण्यासाठी जत्रेचे स्वरूप आले सर्व पूल पाण्याखाली गेल्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे.प्रशासन सज्ज असुन नारीकांनी पाण्याजवळ जाऊ नये असे आवाहन केले आहे.

क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले पादचारी पुलावर पाणी येवू लागले आहे.त्यामुळे 1969नंतर प्रथमच मोसम नदीस येवढ्या मोठ्या प्रमाणावर पुर पाणी आले आहे.संगमेश्वर रस्त्यावरील नदीस लागुन असलेल्या घरे व दुकानात पाणी शिरले आहे.किल्ला भागातील नदी किनारी असलेल्या घरांमध्येही पाणी घुसले आहेत.
मालेगाव शहर परिसरात शनिवारी पावसाने विश्रांती घेतली होती मात्र रविवारी सकाळपासूनच शहरात पावसाचा जोर पाहायला मिळाला. कमी अधिक प्रमाणात दिवसभर संततधार पाउस दिवसभर सुरूच होता. अशीच स्थिती तालुक्यातील झोडगे, दाभाडी, करंजगव्हाण आदी परिसरात असल्याने पावसाने सर्वदूर हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. 


गिरणा नदीपाठोपाठ शहराच्या मध्यातून वाहणा-या मोसम नदीला देखील पूर आल्याने पुराचे पाणी  वैतागवाडी पूल, कॅम्प बंधारा, द्याने सांडावा पूल, होळकर पूल, सांडावा पूल, रामसेतू हे पाण्याखाली गेल्याने पाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तर गिरणा नदीतील पूरस्थिती कायम असून  चणकापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने पाणीपातळीत वाढ झाली आहे. गिरणा व मोसम नद्या पूरपाण्यामुळे दुथडी भरून वाहत असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  दुपारी प्रांत विजयानंद शर्मा, तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांनी रोकोडोबा परिसर व गिरणा पुलावर भेट देऊन पूरस्थितीची पाहणी केली असून यंत्रांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्यात.  मोसमनदीला पुराचे पाणी आल्याने शहरातील सर्व पूल पाण्याखाली गेले होते. पालिकेचे अग्निशमन अधिक्षक संजय पवार यांच्यासह आपत्कालीन विभागाचे अधिकारी कर्मचारी नदीपात्रालगत उभे राहून नागरिकांना सतर्क राहण्याचा सूचना देत होते.

गिरणा धरण व तळवाडेचा साठा वाढला...

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून गिरणा व मोसम नद्यांना सुरु असलेल्या पाण्याचा विसर्गामुळे शहराला पाणीपुरवठा करणा-या गिरणा धरण व तळवाडे साठवण तलावात समाधानकारक पाणीसाठा वाढला आहे. 


ताज्या बातम्या