Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा निर्णय;कलम 35 ए,370 कलम हटवले...

दि . 05/08/2019

वृत्तसंस्था--मोदी सरकारने सोमवारी संसदेत काश्मिरमधील कलम ३७० आणि कलम ३५ अ रद्द करण्याचा ऐतिहासिक प्रस्ताव मांडला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यासंदर्भात राज्यसभेत निवेदन दिले. यानंतर राज्यसभेत विरोधकांचा एकच गोंधळ पाहायला मिळाला. काश्मीरमधील कलम ३५ अ हटवण्याच्या निर्णयाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही मंजुरी दिली आहे. 

 

या गोंधळात अमित शहांनी आणखी काही प्रस्ताव संसदेत मांडले. यामध्ये जम्मू-काश्मीर पुनर्रचना आणि काश्मीर आरक्षण सुधारणा विधेयकाचा समावेश आहे. जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयकानुसार काश्मीरचे लडाख आणि उर्वरित काश्मीर असे दोन भाग करण्यात आले आहेत. हे दोन्ही प्रदेश केंद्रशासित असतील. यापैकी जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा असेल. तर लडाखमध्ये विधानसभा नसेल. 

मात्र, कलम ३५ अ रद्द केल्यामुळे विपरीत पडसाद काश्मीर खोऱ्यात उमटू शकतात. या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीर सरकारने रविवारी लागू केलेल्या आदेशानुसार राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.


ताज्या बातम्या