Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
माजी खासदार समीर भुजबळ यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल..

दि . 03/08/2019

मालेगाव- तालुक्यातील दाभाडी येथील गिसाकानगर मधील आर्मस्ट्राँग इन्फास्ट्रक्चर प्रा. लिमिटेड कंपनीला लाभ पोहोचविण्यासाठी सरकारी कागदपत्रात फेरफार केल्याप्रकरणी दाभाडीचा तलाठी व कंपनीचे संचालक माजी खासदार समीर मगन भुजबळ यांच्याविरोधात छावणी पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाभाडी येथील शिवाजी सिताराम पाटील (४८) या शेतकर्‍याने याबाबत छावणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दाभाडी शिवारातील गट नंबर १२०/७९९ ही शेतजमिन पाटील यांची आई श्रीमती निंबाबाई सिताराम पाटील यांची वडिलोपार्जित शेती आहे. या जमिनीच्या सातबारा उतार्‍यावर इतर अधिकारात त्यांचे नाव समाविष्ट आहे. 
दरम्यान, दाभाडीचे तलाठी पी. पी. मोरे यांनी भुजबळ यांच्या सांगण्यावरून शेत गट नंबर १२०/७९९ च्या सातबारा उतार्‍यावर जुलै २०१४ मध्ये एकाच महिन्यात पडित व पीकपेरा असा वेगवेगळा शेरा मारुन तो अपर जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केला. तलाठ्याने आर्थिक फायद्यासाठी अधिकाराचा गैरवापर करुन सरकारी कागदपत्रात फेरफार केल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. 
या प्रकरणी महसूल विभागाने केलेल्या चौकषीत तलाठी मोरेंवर दोषारोप सिद्ध झाले. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेनंतर सीआरपीसी १५६ (३) अन्वये छावणी पोलिस ठाण्यात तलाठी मोरे व कंपनीचे संचालक समीर भुजबळ यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जी. के. आखाडे हे करित आहेत.


ताज्या बातम्या