Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
भ्रष्ट मार्गाने बेकायदेशीर कत्तलखण्याला दिलेल्या परवानग्या रद्द करून CID मार्फत चौकशीची सवंदगावकरांची मागणी..

दि . 03/08/2019

मौजे सवंदगाव तालुका मालेगाव हद्दीत बेकायदेशीर स्लॅटर हाऊस बांधकाम नाहरकत प्रकरणी तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी व स्लॅटर हाऊस उभारण्यास देण्यात आलेल्या बोगस कागद पात्रांच्या आधारे देण्यात आलेल्या परवानग्यांची CID चौकशीची अपर जिल्हाधिकारी,मालेगाव यांच्या कडे मागणी व आंदोलनाचा सावंदगावकरांचा इशारा..

             सवंदगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत वेळोवेळी सवंदगाव ग्रामपंचायत हद्दीत स्लॅटर हाऊस व कत्तलखाने यांना परवानगी देण्यात येऊ नये असे ठराव समस्थ ग्रामस्थांनी मंजूर केले होते. तरी देखील ततत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांनी कत्तलखाना व्यावसायिकाशी हितसंबंध जोपासत ग्रामसभेचा विरोध झुगारून ग्रामपंचायत कार्यालय सवंदगाव ता. मालेगाव यांच्या मासिक सभा दि.- २८/५/२०१८ ठराव क्र. १८ अन्वये अलशिफा अँँग्रो फूड्स तर्फे नबी अहमद अहमद उल्ला यांना त्यांच्या मालकीच्या मौजे सवंदगाव शिवारातील गट नं २२६/२, २२६/४, २२७/१/अ, २२७/१/ब, २२७/१/क मधील क्षेत्रात पशुवध गृह सह बोकड आणि निकामी म्हैस अँटीग्रेटेड स्लॅटर हाऊस कत्तलखाना व त्यावर प्रक्रिया करणारे मांस फ्रिझिंग कुलिंग हाडाचा चुरा करणारे केंद्र वापरासाठी ग्रामपंचायत सवंदगाव  तर्फे  दि १५/६/२०१८ तसेच मौला अली शेख  गट नं-६१-१/२/३ यांच्याही परवानगीस २६ /१/२०१७ रोजी बेकायदेशीर ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आलेले होते. 

           स्लॅटर हाऊस व त्यावरील प्रक्रिया केंद्रांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. रक्त मिश्रित पाणी परिसरात पसरून शेती व पिण्याच्या पाण्यात त्याचा अंतर्भाव होऊन पाणी पिण्या व शेती योग्य राहत नाही. प्रचंड दुर्गंधी पसरते. शेती व रहिवास धोक्यात येतो. यासर्व धोकादायकबाबींचा अनुभव दरेगाव व पवारवाडी, मालेगाव भागातील स्लॅटर हाऊस व कत्तलखाण्यांमुळे सवंदगाव भागातील नागरिक घेत असून सवंदगाव ग्रामपंचायत हद्दीत कोणत्याही प्रकारचे जनावरांवर/प्राण्यांवर प्रक्रिया करणारे उद्योग उभारण्यास तीव्र विरोध ग्रामपंचायत सवंदगावच्या ग्रामसभेत समस्थ ग्रामस्थांनी वेळोवेळी केला आहे. तसेच सवंदगाव ग्रामपंचायत हद्दीत अश्या उद्योगांना परवानगी दिल्यास जनभावनेचा उद्रेक होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

                याप्रकरणी ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे साहेब यांच्या कार्यालयात ग्रामस्थ, गट विकास अधिकारी यांच्या समवेत बैठक संपन्न झाली होती त्यात राज्यमंत्री भुसे यांनी ग्रामस्थांचा विरोध असतांना अश्या प्रकारे ना हरकत प्रमाणपत्र कसे काय दिले याबाबत ग्रामसेवक आहिरे यांना जाब विचारला असता ग्रामसेवक निरउत्तर झाले होते. त्यावर नाशिक जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकारी नरेश गीते यांना भ्रमणध्वनी वरून याबाबत सविस्तर माहिती देत संबंधितांवर कारवाई करण्याची सूचना दिली, त्यानुसार ग्रामसेवक यांचे निलंबन करण्यात आले आहे. ग्रामविकास राज्यमंत्री मोहदय यांच्या आदेशप्रमाणे सर्व नाहरकत प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी पंचायत समिती मालेगाव व ग्रामपंचायत सवांदगाव मार्फत पत्रव्यवहार करण्यात आला आहे. परंतु ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात आली नाही.

               तसेच ग्रामपंचायत सवांदगाव तर्फे बिनशेती परवानगी प्रकरणी देण्यात आलेले नाहरकत प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी उपविभागीय अधिकारी मालेगाव यांना देण्यात आलेल्या अहवालात स्पष्ट केले आहे की बेकायदेशररित्या ग्रामसभेचा भविष्यात ग्रामपंचायत हद्दीत स्लॅटर हाऊस उभारण्यास परवानगी देण्यात येऊ नये बाबत निर्णय व ठराव झालेला असताना देखील ग्रामसेवक व सरपंच यांनी नाहरकत प्रमाणपत्र दिले म्हणून ग्रमसेवकास निलंबित केले असताना देखील बिनशेती परवानगी देण्याचा घाट घातला जात आहे. स्लॅटर हाऊस उभारण्यास आवश्यक परवाने मिळविण्यासाठी बोगस कागदपत्रे व पुरावे तयार करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे संपूर्ण यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. 

            तरी मौजे सवंदगाव तालुका मालेगाव हद्दीत बेकायदेशीर स्लॅटर हाऊस बांधकाम नाहरकत प्रकरणी तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत व स्लॅटर हाऊस उभारण्यास देण्यात आलेल्या बोगस कागद पात्रांच्या आधारे देण्यात आलेल्या परवानग्यांची CID चौकशी करण्यात यावी व बेकायदेशीर दाखले दिल्यामुळे त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावेत अन्यथा सवांदगाव ग्रामस्थ दि. ७ ऑगस्ट २०१९ रोजी लाक्षणिक उपोषण करतील असा इशारा यावेळी सावंदगाव ग्रामस्थांनी दिला.
यावेळी सरपंच पोपट काळू शेवाळे,उपसरपंच हिरामण दळवी,निखिल पवार,निलेश शेवाळे,पिकन शेवाळे,मनोहर शेवाळे,पृथ्वीराज शेवाळे,पिंटू सूर्यवंशी,पंडित अहिरे,मनीषा शेवाळे,विकास देवरे,सचिन देवरे,तात्या शेवाळे,नितीन शेवाळे,बबलू शेवाळे,नंदू शेवाळे,अमोल बागुल,विजय शेवाळे,सदानंद शेवाळे,बाप्पू शेवाळे,तात्या सूर्यवंशी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

 


ताज्या बातम्या