Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
महसूल दिनाचे औचित्याने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मालेगाव प्रांत यांच्याकडून सत्कार..

दि . 02/08/2019

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव..

मालेगाव: येथे महसूल विभागाच्या कार्यक्रमप्रसंगी तालुक्यातील उत्कृष्ठ कामगिरी करणा-या कर्मचाऱ्यांचा  प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रस्तावित संजय गांधीचे तहसीलदार प्रमोद हिले यांनी केले.यावेळी तहसीलदार चंद्रजीत राजपूत,नायब तहसीलदार सुर्यवंशी,बी.डी.वाणी व सर्व महसूल कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.

मतदार नोंदणीमध्ये महसूलसह सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने काम केले आहे. महसूल विभागाची खरी ताकद ही कर्मचारी आहे. त्यांनी आपली कर्तव्य पार पाडत असताना एक नेतृत्व म्हणून काम करावे. जिल्ह्यात प्रशासनातील महत्वाचा विभाग म्हणून महसूल विभागाची ओळख आहे. या विभागातून वर्षभरात अत्यंत उत्कृष्ठ पद्धतीने कामे केली गेलेली आहेत.

महसूल विभाग हा जिल्हा प्रशासनातील सर्व प्रशासकीय विभागाचा कणा आहे. अधिका-यांच्या चांगल्या कामामुळे प्रशासकीय कामात मालेगाव नंबर वन राहिलेआहे, असे प्रतिपादन प्रांताधिकारी शर्मा यांनी केले. मालेगाव तहसील कार्यालयातील सभागृहात महसूल दिनानिमित्त हा गौरवाचा कार्यक्रम उपविभागाच्यावतीने उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी कोतवाल ,शिपाई,वाहन चालक,लिपिक,तलाठी,अवल कारकून,मंडळ अधिकारी,नायब तहसीलदार अश्या १० जणांचा यावेळी प्रत्येकास प्रशस्तीपत्र ,मानचिन्ह आणि प्रेरक म्हणून रोपटे देत गौरव करण्यात आला.

पुरस्कारार्थी ---
कोतवाल-बाळू वसंत काबळे
शिपाई-मधुकर सखाराम व्यवहारे,
वाहन चालक-विलास जाधव ,
लिपिक-गणेश मारक,शोयब शेख,
तलाठी-देविदास सोलवड,शेख शफी शेख गणी,
अवल कारकून-शेखर अहिरे,
मंडळ अधिकारी-संजय काळे,
नायब तहसीलदार-राजेंद्र सूर्यवंशी..

 


ताज्या बातम्या