Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
वारी लाल परीची... गाथा नव्या युगाची परी अवतरली मालेगावात..

दि . 31/07/2019

वारी लाल परीची... गाथा नव्या युगाची...' चार वर्षात एसटीत झालेल्या अमुलाग्र बदलाची अशा अशाची माहिती सांगणारे चित्रप्रदर्शन मालेगावच्या जुन्या एसटी आगारात एका एसटीमध्ये भरवण्यात आले आहे. यामध्ये एसटी सेवा सुरु झाली तेव्हापासूनची एसटी बसच्या प्रतिकृती व एसटीची माहिती देणारे हे प्रदर्शन आहे. 

या प्रदर्शनात राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेत आजवर दाखल झालेल्या बसेसचे लहानसे मॉडेल सर्वांसाठी कौतुकाचा विषय ठरले. प्रवाशांच्या सेवेसाठी एस.टी. बसमध्ये वारंवार करण्यात आलेल्या बदलांचा प्रवास या प्रदर्शनातून उलगडण्यात आला.लाल पिवळ्या बसेसपासून ते शिवशाही आणि बसस्थानकांपासून ते बसपोर्ट असा मोठा पल्ला गाठणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा प्रवास या प्रदर्शनातून उलगडत आहे. या प्रदर्शनात जुन्या बसेसची छायाचित्रे, माहिती फलक यातून माहिती देण्यात आली.

इतिहासाला उजाळा...

७० वर्षांच्या इतिहात प्रवासी सेवेत असलेल्या राज्य परिवहन महामंडळाने आपल्या सेवेत अनेक चढ-उतार पाहिले आणि आमूलाग्र बदलही केला. वाढती लोकसंख्या आणि विस्तारलेल्या क्षेत्रात पोहोचताना एस.टी. बसमध्ये कसा बदल होत गेला याविषयीची रंजक माहिती एस.टी.च्या ‘वारी लाल परीची’ प्रवाशांना दिली जात आहे. सदर प्रदर्शन मालेगाव येथील नवीन बसस्थानकात सुरू केले होते.


ताज्या बातम्या