Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
भाजपमध्ये मेगाभरती! दिग्गज नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश..

दि . 31/07/2019

निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनके दिग्गज नेत्यांनी भाजपात केला प्रवेश 

या' नेत्यांनी केला प्रवेश : मधुकर पिचड, वैभव पिचड, चित्रा वाघ, शिवेंद्रराजे, संदीप नाईक, कालिदास कोळंबकर 

नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या 52 नगरसेवकांनीही केला भाजपात प्रवेश 

 गरवारे क्लब येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व नेत्यांचे जंगी स्वागत केले

मुख्यमंत्री काय म्हणाले? 

● महाराष्ट्रातल्या आपली वेगळी ओळख निर्माण करणारे दिग्गज लोक भाजपाच्या परिवारात आले याचा मनस्वी आनंद होतो आहे
● भाजपात येणाऱ्या नेत्यांना आम्ही कोणताही धाक आणि प्रलोभन दाखवली नाही. तर ती स्वतः हून जनतेच्या इच्छेने भाजपात आली आहेत
● भारतीय जनता पक्ष ही धर्मशाळा नसून कुणालाही भाजपात प्रवेश दिला जात नाही
● मधुकर पिचड यांचा भाजप प्रवेश आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा आम्हाला फायदा होईल
● शिवेंद्रराजे हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत ते भाजपात येणे ही आनंदाची बाब आहे
● कालिदास कोळंबकर हे लोकांमधून आलेले नेते आहेत. सामान्य माणसे आणि पोलिसांठी जे आंदोलन केले ती बाब चांगलीच आहे

या पक्षप्रवेशामुळे आजचा दिवस हा भविष्यातील महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरणार आहे 

 


ताज्या बातम्या