Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
सोयगावकर मोकाट जनावरांमुळे हैराण

दि . 31/07/2019

सोयगाव - शहर व परिसरात मोकाट जनावरामुळे सोयगवकर हैराण झाले आहेत. या मोकाट जनावारांमुळे छोट्या मोठ्या अपघातांना आमंत्रण मिळत आहे. जनावरांच्या झुंजीमुळे अनेकवेळा मोठे अपघात पतीसार घडले आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष घालून मोकाट जनावरांचा बंदोबस्त लावावा अशी मागणी सोयगवकारांकडून होत आहे. 

सकाळपासून ही मोकाट जनावरे रस्त्यावर, नगर, कॉलन्यांमध्ये मोकाट फिरत असतात. गेल्या आठ दिवसापूर्वी तर सोयगावातील तुळजाई कॉलनी भगत राहणाऱ्या गुलाब निकम यांच्या लहान मुलीवर अचानक एका मोकाट जनावराने हल्ला करून तिला जखमी केले आहे. सुदयवाने ती यातून बचावली. तर शुक्रवारी (दि.२०) सोयगाव येथे आषाढ महिन्यानिम्मित माहेरवाशिणी आई माऊली मंदिरात निवद्य ठेवण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी आपल्या लहान मुलांना सोबत घेउन आल्या होत्या मात्र अचानक एक मोकाट वळू महिलांच्या गर्दीत घुसल्याने यात अनेक महिलांसह लहान मुलेही जखमी झाले.  यामुळे सोयगावसह परिसरात घबराट पसरली आहे. अश्या घटना वारंवार घडू नयेत यामुळे यावर महापालिकेने उपाययोजना करणे गरजेचे आहे.


ताज्या बातम्या