Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
राज्यसभेत इतिहास घडला; तिहेरी तलाख विधेयक पास.

दि . 30/07/2019

ऐतिहासिक तिहेरी तलाक विधेयक मंगळवारी राज्यसभेत मंजू करण्यात आले. मंगळवारी राज्यसभेत तिहारी तलाक विधेयकावर प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. दरम्यान, भाजपाने या विधेयकाचे समर्थन करत हे विधेयक म्हणजे महिलांच्या सन्मानासाठी तयार करण्यात आलेले विधेयक असल्याचे म्हटले. मतदानादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे अनुपस्थित होते. तसेच टीएसआर, बसपाचे खासदार उपस्थित नव्हते. दरम्यान हे विधेयक सिलेक्ट कमिटीकडे पाठवण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु भाजपाने याला विरोध केला. 100 विरूद्ध 84 च्या फरकाने हे विधेयक सिलेक्ट कमिटीकडे पाठवण्याचा प्रस्ताव फेटाळण्यात आला.


ताज्या बातम्या