Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
पुनद,चनकापूर चे पाणी पोहोचले मालेगाव तालुक्यात...

दि . //

मालेगावसह कसमादे पट्ट्याची तहान भागविणा-या पुनद, हरणबारी, चणकापूर धरण पाणलोट क्षेत्रात मात्र जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मंगळवारी पुनद धरणातून ३१३९ क्युसेस, चणकापूर धरणातून २०६८ क्युसेस तर ठेंगोडे बंधा-यातून ३४४४ क्युसेस पाण्याचा विसर्ग गिरणा नदी पात्रात सोडण्यात आला आहे. पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने पुन्हा एकदा गिरणा नदी खळाळली असून तालुक्यातील  गिरणा नदी काठच्या गावांना यामुळे दिलासा मिळाला आहे.यंदा मात्र चणकापूर, हरणबारी धरण पाणलोट क्षेत्रात उशिराने पावसाने जोर धरल्याने पुराच्या पाण्याची प्रतीक्षा कायम आहे. दरम्यान मंगळवारी पुनद, चणकापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आल्याने गिरणा नदी खळाळली आहे. गिरणा नदीत पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कचे इशारा देण्यात आला असून महसूल यंत्रणेस सज्ज राहण्याचे आदेश तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांनी दिले आहे. सायंकाळी उशिरापर्यंत तालुक्यातील चिंचावड आघार परिसरातील गिरणा नदी पात्रात पाणी पोहचले.


ताज्या बातम्या