Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
पोलिसांच्या हाकेच्या अंतरावर जुगारावर असलेल्या जुगारी अड्यावर विशेष पथकाची कारवाई..

दि . 25/07/2019

जयखेडा पोलिसांच्या हाकेच्या अंतरावर जुगारावर असलेल्या जुगारी अड्यावर विशेषपथकाची कारवाई..

 

मालेगाव -  येथील अपर पोलीस अधीक्षक  संदिप घुगे यांच्या विशेष पथकातील पो. उप. निरी कल्पेश कुमार

चव्हाण, पो.हवा निकम, पो. शि साबळे,  शेरावते, पो. शि. पवार, तसेच जयखेडा पोलीस स्टेशन कडील पोना साळवे,पोना राऊत अशांना  आज रोजी १७/ ३० वाजेच्या

मिळालेल्या बातमीच्या आधारे केलेल्या छापा कारवाईत जायखेड़ा गांवी, नांदीन रोड लगत मोसम नदी किनारी मटन मार्केटच्या पाठीमागे मोकळया जागी  दत्तात्रय हिरामण आहीर रा.जायखेडा ता. सटाणा, , नंदु दशरथ कुवर रा. गोरखवाडी जायखेडा ता. सटाणा, (मटका टिपणारा), झांबरू सिताराम शेवरे ४० रा. रानपाडा ता. दिंडोरी जि. नाशिक (मटका खेळणार), रोहिदास चिंतामण वारडे वय ३१ वर्ष रा. वानजुळे ता. ता. दिंडोरी जि.नाशिक (मटका खेळणार),नंदकिशोर वसंत गायकवाड़ वय ४५ (मटका खेळणार) रा. तरवाडे भामेर ता. सटाणा जि. नाशिक ६) संजय उर्फ सजु नाना बच्छाव रा. जायखेडा ता. सटाणा (मटका मालक, फरार) व ७) नाना निकुंभ रा. जायखेडा ता. सटाणा(मटका मालक, फरार) ७) नंदु पहिलवान (मटका मालक, फरार) रा. जायखेडा ता. सटाणा असे कल्याण नावाचे मटका जुगारावर लोकांकडुन पैसे लावुन घेवुन खेळत व खेळवित असतांना एकुण रूपये २२९१०/- व मटका जुगाराचे साहित्यसाधने त्यात तीन मोबाईल व एक मोटर सायकल कि. एकुण ४०,०००/- असे एकुण ६२,९१०/- रू मुद्देमालासह मिळुन आले आहेत.

तरी सदर इसमांवर जायखेडा पोलिस स्टेशन येथे मुंबई जुगार कायदा कलम १२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ताज्या बातम्या