Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मसगा महाविद्यालय व हिरे कन्या विद्यालयात प्रश्नांवलीद्वारा मतदार जागृती..

दि . 25/07/2019

मालेगांव-येथील मसगा महाविद्यालय व आरबीएच महाविद्यालयात  प्रश्नावलीद्वारे विद्यार्थ्यांमध्ये मध्ये जागृती करण्यात आली. नायब तहसीलदार डॉ धर्मेन्द्र मुल्हेरकर यांनी या मोहिमेमागची भूमिका विशद केली. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून सर्व शाळा व महाविद्यालयात विद्यार्थी  यांना एका प्रश्नावलीद्वारे स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांची माहिती भरून देण्याचे आवाहन केले आहे.  त्यात त्यचे नाव मतदार यादीत समाविष्ट आहे का ? 
घरातील १८ वर्षावरील सर्व सदस्याचा समावेश आहे काय? त्याचबरोबर दिव्यांग मतदार सदस्याबाबतही माहिती विचारण्यात  आली आहे. 
डॉ. मुल्हेरकर यांनी या मोहिमेची सविस्तर माहिती दिली. या वेळी संबंधीत महाविद्यालयांचे प्राध्यापक डॉ एम एस सोनवणे, सीडी रजपूत, ए बी वाघचौरे, ऊपमुख्याध्यापक दिनेश पवार आदी ऊपस्थित होते.

 


ताज्या बातम्या