Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
धुळे जिल्ह्यात एकाच दिवशी तिघांना लाच घेतांना मुसक्या आवळल्या..

दि . 25/07/2019

- धुळे जिल्ह्यात एकाच दिवशी तीन लाचखोरांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुसक्या आवळल्या आहेत. धुळे प्रादेशिक परिवहन अधिकारी परवेश तडवी याला साडेचार लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्या प्रकरणी कारवाई केल्या नंतर,  धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिरपूर तहसील कार्यालयात दोन लाचखोरांना आठ हजार रुपयांची लाच घेत असताना रंगेहात पकडले आहे. तक्रारदाराची शेतजमीनही बिनशेती करण्यासाठी कैलास कंखरे अव्वल कारकून याने दहा हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती ही रक्कम आठ हजार रुपये निश्चित करण्यात आली. कंखरे चा साथीदार चंद्रसिंग पवार यांनीही लाचेची रक्कम स्वीकारली. पवार याने लाच स्वीकारताच Acb च्या अधिकाऱ्यांनि त्याला रंगेहाथ पकडले. दोघांवर शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


ताज्या बातम्या