Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
पाटणे ग्रामस्थांच्या आंदोलनास यश ; ग्रामविकास अधिकारी सुरंजे शेवटी निलंबित..

दि . 24/07/2019

मालेगाव – तालुक्यातील पाटणे येथील सन २०१५ – १६ या वर्षातील  १४ व्या वित्त आयोगातील कामात अनियामितात आढळून आल्याने ग्रामसेवकास निलंबित करण्याचे आदेश येथील पंचायत समिती गटविकास अधिकारी आनंद पिंगळे यांनी दिले आहेत. सुभाष बुधा सुरंजे असे या निलंबित ग्रामसेवकाचे नाव आहे. याप्रकरणी गेल्या चार ते सहा महिन्यापासून उप सरपंच जितेंद्र खैरनार व ग्रामस्थांकडून आंदोलन सुरु होते. त्यांच्या आंदोलनानंतर अखेर प्रशासनाकडून ही कठोर कारवाई झाली आहे.

पाटणे गावात १४ व्या वित्त आयोगातून अंगणवाडी, जेष्ठ नागरिक सभा मंडप,  पाणीपुरवठा आयोजन अशी विविध कामे करण्यात येणार होती. मात्र या कामांचा दर्जा निकृष्ट असून कामांमध्ये अनियामितीतात असल्याची तक्रार उपसरपंच जितेंद्र खैरनार यांनी जिल्हा परिषद सीइओ यांच्याकडे केली होती. यानंतर संबधित तक्रारीसंदर्भात सीइओ यांनी गटविकास अधिका-यांना सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. गटविकास अधिकारी यांच्या चौकशी अहवालात सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर दोषी असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता मात्र कारवाई झाली नव्हती. अखेर जून २०१९ मध्ये गटविकास अधिकारी यांच्या कार्यालाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. याप्रकरणी ग्रामसेवकावर अंगणवाडी बांधकामात अपूर्णता, जेष्ठ नागरिक सभा मंडपात अनियमितता, मासिक सभा व ग्रामसभेचे नमुने अपूर्ण ठेवणे, ग्रामनिधी व पाणीपुरवठा निधीच्या खर्चात अनियमितता केली असल्याचे दोषारोप ठेवण्यात आले असून अखेर निलंबन कारवाई झाली आहे.

·       त्रयस्थ संस्थेकडून चौकशीची मागणी कायम

ग्रामस्थांनी आंदोलन दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची त्रयस्थ संस्थेमार्फत चौकशी व्हावी व सरपंच तसेच ग्रामसेवक दोघांवर कारवाईची मागणी केली होती. या संदर्भात लेखी आश्वासन देखील मिळाले होते. मात्र अद्याप त्रयस्थ संस्थेकडून चौकशी झाली नसून अशाप्रकारे चौकशी व्हावी व सरपंचांवर देखील कारवाई व्हावी ही मागणी कायम असल्याचे उपसरपंच जितेंद्र खैरनार यांनी सांगितले.


ताज्या बातम्या