Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मुसळधार पावसाने तालुका सुखावला; पण, मालेगाव मनपाची अब्रू चव्हाट्यावर..

दि . 21/07/2019

अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मालेगावकरांवर वरुणराजाने जोरदार कृपावृष्टी केली.

अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नगरकरांवर वरुणराजाने काल जोरदार कृपावृष्टी केली. सायंकाळनंतर मुसळधार पाऊस झाल्याने संपूर्ण शहर जलमय झाले. सखल भागात  पाणी साचल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लगतेय. शहरातील सर्व सखल भागात अक्षरश: तळी साठली. तर रस्त्यांना ओढ्या नाल्यांचे स्वरूप प्राप्त झाले. पावसाळ्यापूर्वी करण्यात येणा-या नियोजनात कसर राहिल्यानेच महापालिकेची अब्रू चव्हाट्यावर आली. 
मान्सून लांबल्याने नागरिकांचे डोळे आकाशाकडे लागले होते. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वातावरण ढगाळ होते. उकाडाही जाणवत होता. दुपारनंतर मालेगाव शहर, तालुक्यात तसेच कासमादे सह जिल्हाभर पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नगरकरांना दिलासा मिळाला. 

पावसाळ्यात आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होऊ नये, तसेच पावसाच्या पाण्याचा लगेच निचरा व्हावा, यासाठी नालेसफाई करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. पहिल्याच पावसात महापालिकेने केलेल्या निकृष्ट कामांचे पितळ उघडे पडले. 

शहरातील योगायोग मंगल कार्यालय परिसर ,६० फुटीरोड,सोयगाव,आझाद नगर,पोलीस कवायत मैदान ,हजार खोली,देवीचा मळा कॅम्प ,सोमवार बाजार ,अयोध्या नगर आदी परिसरात दोन ते तीन फुटापर्यंत पावसाचे पाणी साचले. गटारे स्वच्छ केली नसल्याने पाण्याचा निचरा होण्यात अडथळा निर्माण झाला. पावसाबरोबरच गटारंतील पाणी रस्त्यावर आले होते. अतिक्रमणांमुळे अदृश्य झालेले नाले व महापालिकेच्या उदासीनतेमुळेच नगरकरांची पहिल्याच पावसात त्रेधातिरपीट उडाली. 

असे झाले हाल
 साचलेल्या पाण्यात अनेक ठिकाणी वाहने बंद पडली. खड्ड्यांमध्ये अडकून अनेक मोटारसायकलस्वार पडले. हे सारे घडले महापालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे, असा संताप नगरकरांमधून व्यक्त होत होता. 

 

नाले सफाईचे पितळच उघडे : अनेक ठिकाणी रस्त्यावर गटारीचे पाणी


ताज्या बातम्या