Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
‘देवा पाऊस पाड रे’ ; सटाणा तालुक्यातील करंजाड येथे पाण्यासाठी जलाभिषेक..

दि . 18/07/2019

नाशिक जिल्ह्यातील कसमादे परिसरात पावसाने पाठ फिरवल्याने सटाणा तालुक्यातील करंजाड येथे महादेवाच्या पिंडीला जलाभिषेक ग्रामस्थ व महिलांना डोक्यावर हंडा घेऊन पावसासाठी महादेवाला साकडे घातले.

नाशिक जिल्ह्यातील कसमादे परिसरात पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम संकटात सापडला आहे. गिरणा व मोसम नद्यांचा संगम तसेच धरण क्षेत्रात पाऊस नसल्याने धरणे ही कोरडी ठाक झाली आहेत. एका बाजूला थोडयाफार प्रमाणात झालेल्या पावसावर जिल्ह्यातील मालेगावसह परिसरातील शेतकर्‍यांनी पेरण्या तर केल्याच पण नंतर पाऊसच न झाल्याने लावलेल्या पिकाला जगवण्यासाठी पिकांना घरातील पाणी आणून हाताने देत पिक जगवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
पावसाळ्यात सर्वत्र टँकर ही सुरु आहेत. चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. नद्यांचा उगम ते संगम येथे पावसाअभावी चिंता व्यक्त केली जात आहे. याचीच चिंता ग्रामीण भागातील जनतेला भेडसावत असताना ग्रामीण भागात सटाणा तालुक्यातील करंजाड येथे महादेव मंदिराचा संपूर्ण गाभार्‍यात पाणी भरण्यासह विविध युक्त्या केल्या जात आहे. करंजाड येथे पाणी पडावे यासाठी शेतकर्‍यांनी महादेव मंदिराच्या संपूर्ण गाभार्‍यात पाणी भरले. त्यामुळे कुठे तरी देवा पाणी पाड अशी अपेक्षा शेतकर्‍यांना आहे.

 


ताज्या बातम्या