Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
तालुक्यातील सवदंगावात मका पिकावरील अमेरिकन लष्करी आळी नियंत्रण मोहीम कार्यक्रम संपन्न...

दि . 17/07/2019

मौजे सवंदगाव येथे तालुका कृषी विभाग यांच्या विद्यमाने राम मंदिर येथे मका पिकावरील लष्करी आळीचे नियंत्रण कसे करावे यासाठी कृषी विभागाचे निशिगंधा ठाकरे यांच्यासह मनिषा पवार व कृषी विभागाचे अधिकारी एकत्र येत यांचेमार्फत मका पिकावरील लष्करी आळी नियंत्रण मोहिमेबाबत कार्यक्रम घेण्यात आला.या पिकावरील लष्करी आळीचा जीवनक्रम,आळीची ओळख, नुकसानकारक अवस्था व नियंत्रण ठेवण्यासाठी एकात्मिक उपाय पद्धतीचा उपायोजना या बाबतीत माहिती देण्यात आली. 
एकात्मिक पद्धतीने अमेरिकन लष्करी आळी नियंत्रणासाठी शेत तणमुक्त व स्वच्छ ठेवावे, पक्ष्यांना बसण्यासाठी टी आकाराचे पक्षी थांबे लावावेत तसेच गुळाची फवारणी करावी. जेणेकरून मुंगळ्याचे प्रमाण वाढून अंडी पुंज ची प्रमाण कमी होईल. सायंकाळी सात ते दहा च्या दरम्यान प्रकाश सापळे लावावेत त्यामुळे मादी चे पतंग व इतर घटक कीटक आकर्षक होऊन त्यांचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल.नर पतंग सर्वेक्षणासाठी एक-दोन कामगंध लावावेत व मोठ्या प्रमाणात नियंत्रणासाठी एकरी 15 कामगंध सापळे लावावेत. तसेच शेतकऱ्यांनी वेळीच मक्का पिकांचे सूक्ष्म निरीक्षण करावे आणि चुना, बारीक वाळू, रेती पोग्यात 1: 9 प्रमाणात मिसळून त्यात टाकावे. ६% निंबोळी अर्काची फवारणी करावी. अशी माहिती देत कृषी विभागाचे कृषी सहाय्यक निशिगंधा ठाकरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

ही कीड भारतात नवीन असून नाशिक जिल्ह्यात मका पिकांचे सर्वात जास्त क्षेत्र असल्याने,अळीचा प्रादुर्भाव ऊस, ज्वारी,मका या पिकांवर होण्याचा संभव अधिक आहे. यासाठी संपूर्ण गावाने एकत्र येऊन एकाच वेळेस फवारणी करणे म्हणजे एकात्मिक कीडनियंत्रण उपाययोजना करणे गरजेचे आहे.असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले. अशोक पालवे यांनी औषध फवारणी व अळी विषयी मार्गदर्शन केले.यावेळी कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी आर.व्ही.पवार ,सहाय्यक कृषी अधिकारी कृषी सहाय्यक मनिषा पवार , वैशाली दारखा तसेच सवदंगावातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.


ताज्या बातम्या