Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मद्यपान केल्यानंतर दोन मित्रांमध्ये झालेल्या किरकोळ चेष्टामस्करीतून मित्राने मित्राच्या छातीत चाकू भोसकून केला खून..

दि . 15/07/2019

मालेगाव - ​दारूच्या नशेत असलेल्या दोघा मित्रापैकी एकाने मारामारी व भांडण करीत मित्राचाच खून केल्याचा प्रकार​ शहरातील ​सोयगाव नववसाहत परिसरातील एकतानगर भागात रविवारी घडला.​ याप्रकरणी मयत रामसिंग ​तिलकराम गौतम ​( वय २४, रा. उत्तरप्रदेश ह.मु. मालेगाव ) याचा मित्र बाबूलाल गुरुचरण भारती याने फिर्याद दिली असून छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ​​मुळचे उत्तरप्रदेश राज्यातील असलेले ​फिर्यादी बाबूलाल व मयत रामसिंग व आरोपी मिथुन यादव ​हे तिघे मित्र असून शहरात स्टाईल फिटिंग व मजुरीचे काम करतात. रविवारी सायंकाळच्या सुमारास  ​एकतानगर येथे राहत असलेल्या घरी आरोपी मिथुन यादव,​ मृत रामसिंग व फिर्यादी बाबूलाल यांनी दारू आणली. दारूच्या नशेत असतांना एकमेकांची चेष्टा मस्करी करीत असतांना आरोपी मिथुन व मृत रामसिंग यांच्यात मारामारी व भांडण झाले. यात मिथुन याने रागाचे भरात किचनमध्ये जावून चाकू हातात घेऊन मित्र रामसिंग यांच्या छातीत भोसकून त्यास जीवे ठार मारले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ​
पोलिसांनी खून करणारा मिथुन कल्लू याला घेतले ताब्यात.


ताज्या बातम्या