Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
कानमंडाळे सरपंचांचा प्रेरणादायी उपक्रम

दि . 15/07/2019

मालेगाव - वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे
पक्षीही सुस्वरे। आळविती।।
येणे सुख रुचे एकांताचा वास।
नाही गुणदोष। अंगी येत।।
पर्यावरणाचा समतोल टिकविण्यासाठी वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन यांची नितांत गरज आहे. ही गरज ओळखून व महाराष्ट्र शासनाचे ३३ कोटी वृक्ष लागवड या कार्यक्रमाचे आैचित्य साधून चांदवड तालुक्यातील कानमंडाळे येथील सरपंच ज्योती केदारे यांनि गावात आलेल्या कोणत्याही अतिथींच्या हस्ते वृक्षारोपण करण्याचा एक स्तुत्य उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद शाळेतही वृक्षारोपण करण्यात आले. सरपंच ज्योती केदारे या आपले नाशिक येथिल होणारे व्याही (मुलाचे सासरे)शैलेंद्र भाऊसाहेब बनकर यांना वृक्षारोपण करण्यासाठी आमंत्रित करून स्वतःपासून या उपक्रमाची सुरुवात करणार आहेत.या उपक्रमात गावातील इतर लोकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन सरपंच केदारे यांनी केले आहे.


ताज्या बातम्या