Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
कसमादेत मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव

दि . 14/07/2019

मालेगाव - गेल्या तीन ते चार वर्ष्याच्या दुष्काळी परिस्थितनंतर यंदा मालेगाव शहरासह तालुक्यातील काही गावामध्ये वरूनराजाने दमदार सुरुवात केली.त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. तालुक्यातील खरिपाच्या पेरण्या आता उरकल्या आहेत. सोनज, सौदाने, या गावांसह माळमाथा परिसरातील पिके तग धरू लागली आहेत.मात्र या पिकांवर लष्करी नावाच्या अळीने हल्ला चढविला आहे. ही अळी कोवळ्या पिकाचे संपूर्ण पान खाऊन  पिकाचे नुकसान करीत आहे. अळीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे बळीराजा धास्तावला आहे.

माळमाथ्यासह सोनज, टाकळी, मुंगसे, सौदाने, वडगाव आदी परिसरात मोठ्या प्रमाणात मका पिकावर अळीने आक्रमण केले आहे. उगवणी नंतर लगेच किडीचा प्रादुर्भाव झाल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे हे नुकसान कीडनाशकाची बीजप्रक्रीया केल्याने टाळता येऊ शकते. त्यामुळे बियाण्यास कीडनाशकांची व बुरशीनाशकांची बिजप्रक्रीया करून पेरणी करने गरजेचे आहे.  रोगयुक्त पिक कीडीस जास्त बळी पडते व त्यामुळे उत्पादनात मोठी घट होऊ शकते. हे टाळण्यासाठी रोगमुक्त चांगल्या बियाण्यांचा वापर करावा तसेच रासायनीक खतांचा समतोल वापर करून 

नत्राचा असंतुलीत जास्त वापर केल्यास किडीचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यामुळे नत्राचा समतोल वापर करने गरजेचे असल्याचे कृषी विभागाने सांगितले.

 लष्करी अळी मुळे आमच्या मका पिकाचे नुकसान होत आहे. उगवलेल्या सर्व पिकाचे पान या अळीने खाऊन टाकली आहेत. अगोदरच दुष्काळी परिस्थिती त्यात या फवारणीचा खर्च वाढणार आहे.

- दिलीप काकळीज, शेतकरी, दहिकुटे

डगाव परिसरातही लष्करी अळीने शेतकऱ्यांना हैराण केले आहे.महागाची बियाणे घेऊन शेतात पेरली आहेत. त्यात अळीचा प्रादुर्भाव.यामुळे आर्थिक संकटात सापडलो आहोत.

- कोमलसिंग ठोके, शेतकरी वडगाव


ताज्या बातम्या