Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
ग्रामविकास विभागाच्या विकास कामांच्या संदर्भात मुद्दाम अडथळे आणणाऱ्या अधिकाऱ्यांची मस्ती लोकशाहीच्या माध्यमातून जीरवणार-दादाजी भुसे

दि . 13/07/2019

मालेगाव :  वार्ताहर
तालुक्यातील ग्रामस्थांना पावसाळ्यात देखील पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी पाण्याचे महत्व जाणून आहे त्या पाण्याचे नियोजन करावे असे आवाहन ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी केले. 
अग्रेसन भवन येथे जिल्हा परिषद व मालेगाव पंचायत समिती अंतर्गत सरपंच, उपसरपंच मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यावेळी राज्यमंत्री भुसे बोलत होते.
चणकापूर, पुनंद धरणातील पाणीसाठा आजमितीस कमी झाला आहे. तालुक्याती गावांना पाणीपुरवठा करणार्‍या तलावात महिनाभर पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. जर लवकर पाऊस झाला नाही तर तालुक्याला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागेल. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करा. लोकप्रतिनिधी व ग्रामसेवक यांनी गावातील पाण्याबाबतची गंभीर परिस्थिती ग्रामस्थांसमोर मांडा, अशा स्पष्ट सुचना भुसे यांनी यावेळी दिल्या.
राज्यात बाळासाहेब ठाकरे स्मृती योजनेतून एक हजार ग्रामपंचायतींची कार्यालये बांधली जाणार आहेत. त्यातंर्गत तालुक्यात 21 ग्रामपंचातींच्या  बांधकामांना मंजूरी मिळाली आहे. तर नऊ ग्रामपंचायतींना मंजूरीची प्रतिक्षा आहे. ज्या ग्रामपंचायतीच्या बांधकामांना मंजूरी मिळाली त्या गावातील सरपंच, ग्रामसेवक यांना आदेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी सौंदाणेचे सरपंच डॉ. मिलींद पवार यांच्यासह इतर सरपंचांनी विविध सुचना मांडल्या. कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य भगवान मालपुरे, सुरेखा ठाकरे, शंकर बोरसे, सरला शेळके, कृष्णा ठाकरे, दाभाडीच्या सरपंच चारुशिला निकम, विश्‍वनाथ निकम, गटविकास अधिकारी आनंद पिंगळे आदी उपस्थित होते..

 

बाळासाहेब ठाकरे स्मृती ग्रामपंचायत कार्यालय बांधणी योजनेतंर्गत  मालेगाव तालुक्यात 21 ग्रामपंचायती मंजूर झाल्या आहेत. तर, उर्वरित ग्रामपंचायतींना मंजुरीची प्रतिक्षा आहे. या कामात नाशिकस्थित काही अधिकारी आडकाठी आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्या अधिकार्‍यांची मस्ती लोकशाही पध्दतीने जिरवणार.


ताज्या बातम्या