Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगाव शहर तापाने फणफणतेय; टायफाईडच्या रुग्णांमध्ये वाढ..

दि . 13/07/2019

मालेगाव शहरात  साथीच्या रोगांनी थैमान घातले असून  अली अकबर हॉस्पिटल व  वाडिया दवाखान्यात शेकडो टायफाईड तापाचे रुग्ण दाखल झाले आहेत. सिव्हिल हॉस्पिटल मध्ये गेल्या दहा दिवसांत  ५४८ रक्ताचे नमुने तपासण्यात आले. शहरामध्ये अस्वच्छता, घाणीचे साम्राज्य त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. म्हणूनच शहरात रोगराई पसरली आहे तसेच टायफाईडची साथ मालेगाव शहरात पसरली आहे असेही म्हणता येईल.

वाडिया हॉस्पिटलमध्ये ६७ तापाच्या रुग्णांचे रक्त नमुने तपासण्यात आलेत. अली अकबर हॉस्पिटलमध्ये २६५ तापाच्या रुग्णांचे नमुने तपासण्यात आलेत. १४२ टायफाईड सदृश्य रक्ताचे नमुने तपासण्यात आले.१४३ मलेरिया तापाचे नमुने तपासण्यात आलेत. यामध्ये टायफाईडची जास्त रुग्ण सापडले असून शहर तापाने फणफणते आहे.त्या बरोबरच मालेगाव शासकीय रुग्णालयात गेल्या दहा दिवसात ५४८ रुग्णांचे रक्त नमुने तपासले.त्यात 
११८ टायफाईड चे रक्त नमुने तपासण्यात आलेत. त्यातील काही रुग्णांना टायफॉईड ची लागण झाल्याचे समजते..

आरोग्याबाबत  नागरिकांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. आजारांच्या पार्श्वभूमीवर फवारणीच्या संदर्भात  दक्षतेबाबत ओरड सुरू आहे. त्यामुळे लवकरच मलेरिया विभागाच्या परिस्थितीचा आढावा घेणे महत्वाचे आहे.  आरोग्य विभागाला साफसफाईची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या असल्याचे मनपाकडून दिसले नाही. डासांच्या प्रसारावर नियंत्रण आणण्याच्या उपाययोजनाबरोबर वैद्यकीय सुविधेकडे लक्ष अश्या कोणत्याही उपाययोजना करतांना मनपा व मनपा आरोग्यविभाग करतांना दिसत नाही. काही दिवसापूर्वीच बालमृत्यू प्रकरण मनपाच्या महासभेत चांगलेच गाजले असतांनाही शहराच्या आरोग्याच्या बाबतीत मनपाला गांभीर्य नसल्याचे दिसते. 
 
समन्वयाचा अभाव..
टायफाईड तसेच  साथीच्या आजाराचे रुग्ण आढळून येताच त्यावर नियंत्रण आणण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करणो आवश्यक असते. त्यामुळे असे साथीच्या आजाराचे रुग्ण आढळून आल्यानंतर त्याबाबतची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला कळविणो खासगी रुग्णालयांनासुद्धा बंधनकारक आहे. परंतु महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी आणि खासगी रुग्णालये यांच्यात समन्वय नाही. त्यामुळे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे टायफाईड व साथीच्या रुग्णांची नेमकी आकडेवारीही उपलब्ध नाही. 

गेल्या काही दिवसापासून शहराचे तापाचे रुग्ण वाढले असल्याने त्यामुळे महापालिकेचा मलेरिया विभागाला धूळ फवारणी आणि फॉगिंग कामासाठी विसर पडल्या असल्याचे समोर येत आहे मनपाच्या मटेरियल विभागातर्फे औषध फवारणी तसेच फॉगिंग काम केले जाते डास नियंत्रण करण्याचा तर प्रमुख उद्देश असतो मात्र शहरात धूर फवारणी फॉगिंग चे काम नियमित होत नसल्याचे सातत्याने समोर येत आहे फवारणी का होत नाही असा प्रश्न केला तर मनुष्य कमी आहे असे उत्तर या विभागाकडून दिले जाते. 


मोठ्या माणसांबरोबरच लहान मुलांमध्येही मोठ्या प्रमाणात तापाची व आजारांची लागण झाली असल्याची माहिती समोर येत आहे. मालेगाव शहरातील तापाचे प्रमाण लहान मुलांवर जास्त असून गेल्या आठवड्याभरात मालेगाव शहरात टायफाईड चे प्रमाण जास्त असल्याचे समोर येत आहे. 


ताज्या बातम्या