Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
 मेशी महालपाटणे रस्त्यावर पाण्याचा टँकर उलटल्याने युवकाचा मृत्यू..

दि . 13/07/2019

सोपान हा दुष्काळाचा पहिला बळी 

मेशी महालपाटणे येथे रस्त्यावर पिण्याचे पाणी भरण्यासाठी जात असलेला टँकर उलटल्याने युवक ठार झाल्याची घटना घडली आहे. सोपान तुळशीराम चव्हाण ( वय ३१) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

 पहाटे ६ वाजता पाण्याचा टँकर भरण्यासाठी युवक सोपान तुळशीराम चव्हाण ( वय ३१) मेशीहून महालपाटणे येथे जात असतांना गिरणा उजव्या कालव्याच्या पुलाजवळ टॅकर पलटी झाल्याने टँकर चालक सोपान चव्हाण हा टँकरखाली दाबला गेल्याने जागीच मरण पावला.

 स्थानिक ग्रामस्थांनी व गावातील तरुणांनी तात्काळ जेसीबी बोलवत जेसीबीच्या सहाय्याने टँकर सरळ करत सोपानचा मृतदेह बाहेर काढला.


ताज्या बातम्या