Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगावी ग्राहक न्यायालयाची मागणी

दि . 13/07/2019

मालेगावसह कसमादे पट्ट्यातील ग्राहकांना ग्राहक न्यायालयात दाद मागणे सोपे व्हावे यासाठी मालेगावी ग्राहक न्यायालयीची स्थापना करावी, अशी मागणी येथील आम्ही मालेगाकर संघर्ष समितीने केली आहे.

अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांची समितीच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी भेट घेऊन चर्चा केली तसेच निवेदन दिले. यावेळी निखील पवार, देवा पाटील, सुशांत कुलकर्णी, कुंदन चव्हाण, शेखर पगार, भाग्येश कासार, कपिल डांगचे, अॅड. सलाम कुरेशी, अॅड. अतुल महाजन, प्रदीप पहाडे, आनिल पाटील आदी उपस्थित होते. मालेगाव हे यंत्रमागधारकांचे शहर असून, नाशिकनंतर प्रमुख व्यापारी केंद्र झाले आहे. मालेगाव तालुक्याला लागून बागलाण, देवळा, कळवण, नांदगाव, चांदवड तालुके येतात. येथे अपर जिल्हा सत्र न्यायालय देखील कार्यरत आहे. नाशिक येथे ये-जा करणे आर्थिकदृष्ट्या ग्राहकांना परवडणारे नाही. ग्राहकाला नाशिक येथे जाऊन न्याय मागण्यासाठी फेऱ्या मारणे शक्य होत नाही. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकाची फसवणूक झाली तरी तो न्याय मागू शकत नाही.

मालेगाव येथे जिल्ह्यातील सर्व महत्त्वाचे कार्यालय उपलब्ध आहेत. मालेगावच्या लोकसंख्येचा विचार करता तसेच भौगोलिक परिस्थिती पाहता मालेगाव काही वर्षापूर्वी च जिल्हा होणे अपेक्षित होते. मालेगाव व बागलाण, कळवण, देवळा, नांदगाव, चांदवड तालुक्यातील व्यावसायिक प्रतिष्ठाने, ग्राहक संख्या लक्षात घेता मालेगाव येथे ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत ग्राहकाला न्याय मागण्यासाठी न्यायालय स्थापन होणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकाची फसवणूक व लूट रोखता येईल व न्याय प्रक्रिया जलद गतीने होईल त्यामुळे मालेगाव येथे ग्राहक न्यायालय स्थापन करण्यात यावे अश्या मागनीचे निवेदन अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांना देण्यात आले.


ताज्या बातम्या