Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मारहाणीच्या निषेधार्थ सामान्य रुग्णालयात कर्मचाऱ्यांचे एक तासाचे कामबंद आंदाेलन.

दि . 10/07/2019

 मालेगाव 
येथील सामान्य रुग्णालयात काही टवाळखाेर तरुणांनी दाेघा कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी (दि. ९) कर्मचाऱ्यांनी तासभर कामबंद आंदाेलन केले. शहर पाेलिसांनी संशयित सहा जणांविराेधात गुन्हा दाखल केल्याने आंदाेलन मागे घेत कामकाज सुरू करण्यात आले. 
साेमवारी रात्री वार्डबाॅय गणेश ठाेके व परिचारिका वडनेरे या कर्तव्यावर हाेत्या. या दरम्यान सहा तरुण रुग्णालयात अाले. त्यांनी विनाकारण ठाेके यांच्याशी वाद घातला. यातून या तरुणांनी ठाेके यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. परिचारिका वडनेरे यांनी ठाेके यांना वाचविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. गाेंधळामुळे अन्य कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. तेव्हा सदर तरुणांनी रुग्णालयातून पलायन केले. कर्मचाऱ्यांना मारहाणीचे प्रकार वाढत असल्याने सकाळी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदाेलन करत प्रवेशद्वाराबाहेर घाेषणाबाजी केली. कर्मचाऱ्यांना पुरेसे संरक्षण मिळावे, मारहाण करणाऱ्यांना तातडीने अटक करावी या मागण्या करत संताप व्यक्त केला. अखेर वैद्यकीय अधीक्षक डाॅ. किशाेर डांगे, शहर पाेलिस ठाण्याचे निरीक्षक थाेरात यांनी कर्मचाऱ्यांची समजूत काढून गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले. याप्रकरणी शहर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
संशयित ६ जणांविरोधात शहर पोलिसांत गुन्हा 
 


ताज्या बातम्या