Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
रस्त्यावर झोपून गांधीगिरी; किदवाई रोडवर पहिल्या पावसातच २० लाखांचा उखडला..

दि . 10/07/2019

मालेगाव - शहरातील किडवाई रोडवर नुकतेच करण्यात आलेले डांबरीकरण रिमझिम पावसात पूर्णतः वाहून गेल्याने रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधून घेण्यासाठी येथील अवामी पार्टीचे अध्यक्ष रिजवान बेटरीवाला यांनी मंगळवारी रस्त्यावर झोपून आंदोलन केले. यावेळी आंदोलनात इम्रान बेटरीवाला, हनीफ बाबा, मोहम्मद इलियाज, शेख अमीन, इम्रान निहाल आदींसह अवामी पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

गेल्याच महिन्यात या रस्त्यावर ठेकेदाराकडून २० लाख रु. खर्च करून डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र शहरात झालेल्या रिमझिम पावसात रस्त्यावरील डांबरीकरण वाहून गेले असून रस्त्याची चाळन झाली आहे. यामुळे रस्त्यावरून ये जा करणा-या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे. पालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आंदोलक रिजवान यांनी यावेळी केला. या रस्त्यावरून गुलाबपुष्पाची उधळण करीत त्यांनी झोपून आंदोलन केले. यामुळे काहीकाळ रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. जनतेने कररूपाने दिलेल्या पैशाचा भ्रष्टाचार होत असून संबधित ठेकेदारावर कारवाईची मागणी त्यांनी लावून धरली. अखेर पालिकेचे अभियंता चौरे यांनी त्यांची भेट घेऊन संबधित कामाच्या गुणवत्तेची तपासणी करण्यात येईल त्यानंतरच बिल अदा केले जाईल तसेच ठेकेदाराकडून रस्त्याचे काम नव्याने करून घेण्यात येईल असे आश्वासन देण्यात आल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.


ताज्या बातम्या