Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
टाकळीचे भूमीपुत्र IPS सदानंद दाते यांच्या हस्ते जन्मभूमीत वृक्ष लागवड...

दि . 07/07/2019

टाकळी येथे टाकळीचे भुमीपुत्र IPS सदानंद दाते (हेड आँफ इकोनाँमिक आँफेन्स विंग, मुंबई) यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला  वृक्षारोपणाचा कार्यक्रम..

या वेळी कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य, गावातील ज्येष्ठ नागरीक, सर्व तरुण वर्ग, शाळेतील शिक्षक व विद्यार्थी व तसेच गावातील सर्व बाहेर गावी नोकरी निमित्ताने सेवा देणारे भुमीपुत्र अधिकारी उपस्थित होते. या वेळी विद्यार्थ्यांना IPS दाते यांनी ग्रामीण भागातून आहोत म्हणुन स्पर्धा परीक्षेचा न्युनगंड बाळगु नका. जेव्हा गरज वाटेल मी मार्गदर्शनासाठी हजर असेण असे सांगितले तसेच वृक्षारोपण नुसते फोटो काढण्यापुरता मर्यादित न ठेवता दुष्काळावर मात करण्यासाठी आणि पर्यावरणाचा  ह्रास रोखण्यासाठी वृक्षारोपण काळाची गरज आहे असे सांगितले.


ताज्या बातम्या