Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
वडेल शिवारात गावठी दारू अड्डा उध्वस्त; वडनेर खाखुर्डी पोलिसांची कार्यवाही....

दि . 06/07/2019

मालेगाव- तालुक्यातील वडनेर खाकुर्डी पोलिसांनी शनिवारी वडेल शिवारातील अवैध गावठी दारू बनविण्याचा अड्डावर कारवाई करीत तो उध्वस्त केला. या कारवाईत 35 हजार 980 रु. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 4 हजार रु.किंमतीचा मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला आहे.

येथील अपर पोलीस अधिक्षक निलोत्पल, पोलीस उप अधिक्षक शशिकांत शिंदे यांच्या  मार्गदर्शनाखाली शनिवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली. वडनेर खाकुर्डी पोलिस ठाणे  हद्दीतील वडेल शिवार सिंधबन  गाव पाणी पुरवठा धरणाच्या किनारी गावठी दारूचे 2 अड्डे  उध्वस्त केलेत. यात पोलिसांनी 35 हजार 980 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात केला असून त्यापैकी 4 हजार रु. किमतीचा रसायन व माल जागेवर नष्ट केला आहे. याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर कारवाई सहा. पोलिस निरिक्षक रामेश्र्वर मोताळे , पो.हवालदार बी.पी.राऊत , पो.नाईक दिपक शिलावट , अशोक व्यापारे , राजू विटोकार , पो.ना विनोद मोरे यांनी केली.


ताज्या बातम्या