Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
के. बी. एच. फार्मसी महाविद्यालयात जागतिक वृक्षदिन साजरा .....

दि . 06/07/2019

 

मालेगाव :-  के. बी. एच. एस. एस. ट्रस्ट संचलित भायगाव रोड, जाजुवाडी येथील फार्मसी महाविद्यालयातून वृक्षदिंडी काढण्यात आली. वृक्षलागवड जनजागृती व्हावी, यासाठी फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा परिधान करून वृक्षरोप घेऊन मालेगाव कॅम्प, परिसरात भव्य जनजागृती रेली काढण्यात आली. व फार्मसी महाविद्यालयात संस्थेचे विश्वस्त मा. श्री. प्रसादबापू हिरे साहेब, व महाविद्यालयाचे प्राचार्य, श्री. डॉ. बैरागी व्ही.ए. यांच्या हस्ते वृक्षलागवड करण्यात आले. विद्यार्थ्यांनी वृक्षलागवड जनजागृती फेरी काढून  वृक्षदिंडीचा समारोप के. बी. एच. एस. एस. ट्रस्ट संचलित भायगाव रोड, जाजुवाडी येथील फार्मसी, महाविद्यालयात करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष, मा. श्री. प्रसादबापू हिरे साहेब यांनी आपल्या भाषणात वृक्षारोपण व पाणीसंवर्धन करून निसर्ग स्वरक्षणाचे महान कार्य व त्याचे महत्त्व विद्यार्थांना पटवून दिले. महाविद्यालाचे प्राचार्य, डॉ. श्री. विनोद अशोकदास बैरागी यांनी वृक्षारोपण व संवर्धनाचे शास्त्रशुद्ध नियोजन यावर मार्गदर्शन केले. या वेळी विद्यार्थांच्या हातून निंब, चिंच, पळस, जांभूळ, बांबू, आवळा, इ. आयुर्वेदात महत्ता असलेल्या वृक्षांची लागवड करण्यात आली.  प्रमुख पाहुणे म्हणून श्री. प्रवीण पाटील ( क्लिनिकल फार्मसी, U.S.) डॉ. अस्लम पठाण ( डायरेक्टर शाका विद्यापीठ सौदी अरेबिया ) श्री.इक्बाल अहमद आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. संदीप आहिरे ( रा.से.यो.अधिकारी ), अमोल शिरोडे ( विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी ), प्रा. योगेश अहिरे, यांनी परिश्रम घेतले. श्री. डॉ. धनंजय पाटील प्रा. राहुल पगार, डॉ.बच्छाव, प्रा. रूपेश देवरे, डॉ. इम्रान, प्रा. पराग पठाडे, प्रा.अविनाश गांगुर्डे, प्रा.बच्छाव राकेश, प्रा.सोनावणे वाय.टी. डॉ. दिघे राजेंद्र, प्रा. प्रतिक पाटील, प्रा. प्रवीण जाधव, प्रा. भास्कर आहेर, प्रा.कासार, प्रा. वैष्णव श्रध्दा, प्रा. सुनिता गोविलकर, प्रा. विंचू श्रध्दा,  प्रा. परदेशी चेताली,नीलम खैरनार,व इतर प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी तसेच  इतर शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


ताज्या बातम्या