Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरणी मालेगावात तिघांना अटक

दि . 06/07/2019

मालेगाव -देशभरात घडणा-या मॉब लिंचिंगच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरातील आयशानगर पोलीस ठाणे हद्दीतील तिघांनी धार्मिक तेढ निर्माण करणारी व अश्लील मजकूर असलेली आक्षेपार्ह व्हिडियो क्लिप बनवून सोशल मिडीयावर व्हायरल केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आयशानगर पोलिसांनी तत्काळ या तिघांवर कारवाई करीत अटक केली असून त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

आयशानगर पोलीस ठाण्याचे शाम पवार यांच्या फिर्यादीवरून माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाजमाध्यमांवर अशी एक व्हिडियो क्लिप व्हायरल झाल्याची माहिती अयाशानगर पोलिसांनी मिळाली होती.या व्हिडियो क्लिपच्या आधारे पोलिसांनी तपास केला असता आरोपी शहाबाज उर्फ मुस्तीकीन शेख मोइद्दीन ( वय १९, रा. स्वीपर कॉलनी मालेगाव ), रशीद शहा ( वय १९ ,स्वीकार कॉलनी )व एका अल्पवयीन मुलाने ही व्हिडियो क्लिप तयार करून व्हायरल केल्याचे समोर आले. पोलिसांनी त्या तिघांना अटक करून गुन्हा दाखल केला असून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. शहरातील नागरिकांनी अशा प्रकारच्या सामाजिक तेढ निर्माण करणा-या व्हिडियो क्लिप व्हायरल करू नये. तसेच अफवांवर विश्वास ठेऊ नये. असे प्रकार आढळून आल्यास पोलीस प्रशासनास संपर्क करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


ताज्या बातम्या