Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
जाणून घ्या अर्थसंकल्पात काय महाग अन् काय स्वस्त?

दि . 05/07/2019

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारचा अर्थसंकल्प आज सादर केला. या अर्थसंकल्पातून शेतकरी आणि मध्यमवर्गीयांना दिलासादायक घोषणा करण्यात आल्या आहेत. घर खरेदीसाठी मिळत असलेली 2 लाखांची सूट 3.5 लाखांवर नेण्यात आली असून, 45 लाख रुपयांपर्यंत घर खरेदी करणाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. पेट्रोल आणि डिझेलचे भाव 1 रुपयानं वाढणार असून, त्याचा वाहन चालकांना भुर्दंड पडणार आहे. तर सोने तसेच इतर धातूंवरील 10 ते 12.5 टक्क्यांपर्यंत एक्साईज ड्युटी वाढवण्याची तरतूद करण्यात आली आहे. इलेक्ट्रीक कार खरेदी करणाऱ्यांनाही करात विशेष सूट देण्यात आली आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीला चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळेच इलेक्ट्रिक वाहनांवरील 12 टक्के जीएसटी 5 टक्क्यांवर आणण्यात आला आहे. या वाहनांच्या खरेदीसाठी कर्ज घेतल्यास सरकारकडून सवलत दिली जाईल. 

  • या वस्तू महाग होणार

परदेशी तेल, प्लास्टिक, रबर, पेपर छपाई, पुस्तकांची कव्हर आणि छपाई, ऑप्टिकल फायबरसाठी वापरले जाणारे वॉटर ब्लॉकिंग टेप्स, टाईल्सच्या वस्तू (सिरेमिक उत्पादने), स्टेनलेस स्टील, मिश्र धातूचं वायर, एसी, रस्ते बांधकामासाठीचं क्रशर मशिन, लाऊडस्पीकर, डिजिटल व्हिडीओ रेकॉर्डर, सीसीटीव्ही आणि आयपी कॅमेरा, ऑप्टिकल फायबर बंडल, ऑटोमोबाईल साहित्य, ऑटो पार्ट्स, सिंथेटिक रबर, पीवीसी, टाइल्‍स, इलेक्ट्रॉनिक वस्तू, सॉकेट, प्लग्स, सोने, सिगारेट, तंबाखू

  • या वस्तू स्वस्त होणार

साबण, शॅम्पू, केसाचं तेलं, टूथपेस्‍ट, पंखा, लॅम्‍प, ब्रीफकेस, प्रवासी बॅग, सेनिटरी वेअर, बोटल, कंटेनर, भांडी, गादी, बिछाना, चष्म्याची फ्रेम, फर्निचर, पास्‍ता, अगरबत्ती, नारळ, सॅनिटरी नॅपकिन


ताज्या बातम्या