Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
रोटरी इंटरनॅशनल च्या डिस्ट्रिक्ट  3030 च्या गव्हर्नर पदी राजेंद्र भामरे यांचा पद्ग्रहण समारंभ        

दि . 05/07/2019

रोटरीच्या डिस्ट्रिक्ट 3030 च्या गव्हर्नर पदी प्रथमच  कसमादेच्या ग्रामीण भागातून मालेगाव चे सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक रोटेरीयन राजेंद्र भामरे यांची तीन वर्षांपूर्वी निवड झाली होती,19-20 साठी ,रोटरीच्या इतिहासात प्रथमच ग्रामीण आणि पोलिओ साठी संवेदनशील समजले जाणाऱ्या मालेगाव मधून रोटेरीयन राजेंद्र भामरे यांची निवड झालेली आहे,यांचा कार्यकाल हा 1 जुलै 2019 ते 30 जून 2020 पर्यंत असणार आहे,त्यांचा पद्ग्रहण कार्यक्रम दि.7 जुलै रोजी नाशिक येथे गुप्ता लॉन्स ,गंगापूर रोड येथे होत आहे,त्याच्या पद्ग्रहण कार्यक्रमासाठी रोटारीचे संपूर्ण भारतातून अनेक मान्यवरांची हजेरी लागणार आहे ,त्यांना पद्ग्रहणाची शपथ देणेसाठी रोटरी इंटरनॅशनल चे डायरेक्टर रो.कमल संघवी खास करून उपस्थित राहत आहेत तसेच नाशिक चे नामपूर डिस्ट्रीक असलेला हा 3030 डिस्ट्रिक्टचे जवळजवळ शंभर क्लब चे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. रोटरी सारखा आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्थेमध्ये डिस्ट्रिक्ट गव्हर्नर म्हणून नियुक्त झालेले राजेंद्र भामरे यांचे सामाजिक कार्य मोठे आहे,पोलिओ, टी. बी,हृदय शस्रक्रिया आणि तसेच शिक्षण ,पर्यावरणाचा समतोल,जलसंधारण यासारख्या मोठमोठया सामाजिक कार्यात रोटरीच्या माध्यमातून त्यांनी  मोठं काम उभारलं आहे .स्वतः 55 वेळा रक्तदान करून एक रक्तदाता म्हणून सुपरिचित आहेत.मूळचे बागलाण चे भूमीपुत्र असलेले राजेंद्र भामरे हे अतिशय मनमिळवू आणि मितभाषी म्हणून ओळखले जातात.राजेंद्र भामरे यांची डिस्ट्रिक्ट गव्हर्नर चे ट्रेंनिंग हे अमेरिकेत सनदीयागो येथे झाले,आपल्या अमेरिकेतील एक महिन्याच्या वास्तव्यात त्यांनी अनेक शहरांना भेटी देऊन तेथील स्थानिक क्लबला पार्टनर करून डिस्ट्रिक्ट 3030 मध्ये जलसंधारण,आरोग्य,शिक्षण यामध्ये कार्य करण्यासाठी प्रवृत्त केले.त्यांना त्यांच्या रोटरी प्रवासासाठी संपूर्ण डिस्ट्रिक्ट मधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


ताज्या बातम्या