Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगावच्या सामाजिक ऐक्याला कोण खराब करू पाहतेय..?

दि . 04/07/2019

आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर,देशपातळीवर घडणाऱ्या अप्रिय घटनांचे केले जातेय भांडवल ?

खोट्या क्लिप व्हायरल करून द्वेष भावना निर्माण करण्याचा प्रयत्न..

चमकुगिरी करणाऱ्या पोलिसमित्र आणि तथाकथित समाजसेवकांच्या बैठकीचा समाजात किती प्रभाव पडेल याचे संशोधन गरजेचे..

या विषयावर माध्यमानां प्रतिक्रिया देने टाळले...

मालेगाव:आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर,देशपातळीवर घडणाऱ्या अप्रिय घटनांचा बाहू करून मालेगावचे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांकडून अलीकडच्या घटनांवरून दिसून एग आहे.त्यातच मुस्लिम बांधवांचा बकरीईद सण जवळ आला आहे.गोवंश हत्याबंदी असली तरी काही अतिउत्साहीकडून गोवंश जनावरांची वाहतूक होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.आणि हेच प्रमुख कारण शहरासाठी सामाजिक एक्यास धोका निर्माण करणारे ठरेल आशा या गंभीर परिस्थितीकडे जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन फारस गंभीर नसल्याचं मालेगाव करांना जाणवत आहे.
अलीकडे देशभरामध्ये मॉब लिचिंग च्या घटना घडतांना दिसत आहेत आणि यापूर्वीही घडत आल्या आहेत.मात्र,शहरातून त्याची फारशी दखल घेतल्याचे निदर्शनास आले नाही.आमदारकीवर डोळा ठेऊन असलेले हौसे नवसे शहराचे वातावरण खतपाणी घालतांना दिसत आहे.सोशल माध्यमातून दररोज मोठ्या प्रमाणावर समाज मनावर विपरीत आणि खास करून तरुणानांच्या मानात द्वेष भावना निर्माण होतील अश्या क्लिप व्हायरल होत आहेत.पोलीस प्रशासनाकडून यावर मात्र काही कार्यवाही होतांना दिसत नाही.
मालेगावी निघालेला विराट मोर्चा आणि कळमदरी येथील मारहानीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांच्या आवारात ४०-५० लोकांची शांतता समितीची बैठक घेऊन शहर शांततेसाठी आवाहन केले.या बैठकीत चमकुगिरी करणाऱ्या पोलीस मित्रांची संख्या अधिक होती.या तथाकथित समाजसेवकांचा समाजात किती प्रभाव आहे हा संशोधनाचा भाग ठरू शकतो.
अश्याच या परिस्थितीत जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन शहराची बिघडणार परिस्थिती कशी हाताळेल या विषयी चिंता शहरशीयांना लागून आहे.शहरातील शांततेसाठी माध्यमांची भूमिका नेहमीच सकारात्मक राहिलेली असतांनाही शांतता समितीची अथवा सलोख्याची बैठक असो किव्हा सकारत्मक संदेश पोहचवण्याचे काम माध्यमे नेहमीच करता.अलीकडे मात्र माध्यमांना टाळले जाते की काय अशी माध्यम प्रतिनिनिमध्यें शंका आहे.


ताज्या बातम्या