Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालती वाघ यांचा सेवापूर्ती निमित्त सत्कार

दि . 04/07/2019

मालेगाव - मळगाव (ता. मालेगाव) येथील जिल्हा
परिषद प्राथमिक शालेच्या शिक्षिका मालती हिरामण वाघ यांचा (ता.२९ )जून रोजी निवृत्तीनिमित्त सत्कार झाला. ग्रामस्थ व पालक, केंद्रातील
शिक्षकांनी शाळेत आयोजित कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष गुरूवर्य जी.जी.पवार  अध्यक्षस्थानी होते. उपसरपंच मा.राजेंद्र मोहिते, हेमंत निकम,केंद्रप्रमुख निकम, गजानन पगारे, संदिप सोळूंके, नाना चौधरी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यांच्या हस्ते सौ.वाघ यांचा सत्कार करून निरोप देण्यात आला.
केंद्रप्रमुख शोभा हिरे, सरपंच
अनिल देवरे यांच्या हस्ते निरोप देण्यात आला. .यावेळी शाळा व्य.स.उपाध्यक्ष पवार सर, मुख्याध्यापिका सौ.लता निकम, बाळू मोरे ,पोपट सुर्यवंशी, सरला रायजादे,बाळासाहेब शिंदे, शिवदास निकम  यांनी सौ. वाघ यांच्या सहवासातील अनुभव आपल्या मनोगतातुन संगितले.


ताज्या बातम्या