Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मांडूळ तस्करी करणाऱ्या एकास अटक;नव्याने स्थापन झालेल्या कल्पेशकुमार चव्हाण यांच्या विशेष पोलीस पथकाची कार्यवाही...

दि . 02/07/2019

मालेगावमालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी नव्याने स्थापन केलेल्या कल्पेशकुमार चव्हाण यांच्यासह पथकातील देवीसदास निकम,अभिजित साबळे,दिनेश शेरावते,मिलिंद पवार यांच्या छाप्यात मांडूळ जातीचा सापाची तस्करी करणारा अटक केली आहे. याची किंमत सुमारे ५० हजार रुपये आहे.किल्ला पोलीस स्थानकाच्या चंदनपुरी परिसरात विशेष पोलीस पथकाने ही कारवाई केली असून गुन्हा नोंदवत संशयित आरोपीस वनविभागाच्या स्वाधिन केले आहे. 

सविस्तर वूत्त असे की अप्पर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या आदेशानुसार  पथकाने चंदनपुरी येथे मांडूळ जातीचा साप  विकणार आहे अशी माहिती मिळाली होती.

पथकाने नितीन बाबुराव शिरसाठ यास त्याचे राहते घर चंदनपुरी येथून पकडले असून त्याच्या कडून ४ फूट लांबीचा  मांडूळ साप जप्त केलाअसून त्यास अटक केली आहे.

मांडूळ हा वन्यप्राणी संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत कलम ३ नुसार दुर्मिळ असून त्यास विशेष संरक्षण प्राप्त आहे. त्याची तस्करी, किंवा जवळ बाळगणे हा गंभीर गुन्हा आहे. मांडूळ हा साप जसा जसा मोठा होतो व त्याचे वजन वाढते तशी त्याची किंमत वाढते.


ताज्या बातम्या