Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
वीज पडून तेरा वर्षीय बालकाचा मृत्यू; मालेगाव तालुक्यातील सोनज येथील घटना..

दि . 02/07/2019

मालेगाव शहर व परिसरात सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यांसह वीजांचा कडकडाट सुरु असतांना तालुक्यातील सोनज येथे अंगावर वीज पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. बिपीन दशरथ घोंगडे असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव असून त्याच्या मृत्यूने सोनज सह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सोनजसह परिसरात सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह रिमझिम पावसाला सुरुवात झाली. घोंगडे कुटुबीय शेतात वास्तव्यास असून नुकताच शाळेतून आलेला बिपीन घराच्या वरच्या स्लॅबवरील खिडकी (सान) बंद करण्यासाठी घरावर गेला होता. त्याचवेळी जवळच वीज पडल्याने बिपीनचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून बिपीन शाळेत देखील अतिशय हुशार विद्यार्थी होता, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. 


ताज्या बातम्या