Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
प्रेरणादायी प्रवास : मालती वाघ

दि . 01/07/2019

आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो.हे बोलण्यापेक्षा आपल्या कृतीतून साकारत गेल्या ३४ वर्ष्याच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज २९ जुन २०१९ रोजी माझी आई सौ.मालती हिरामण वाघ ही आपल्या ज्ञानदानाच्या कार्यातून सेवानिवृत्त होत आहे. माझ्या आईने आपल्या ज्ञानदानाच्या कार्यातून अनेक हिरे घडवले.
प्रारंभी चांदवड तालुक्यातील परसुल या गावापासून १७ सप्टेंबर १९८५ पासून आईने आपल्या शिक्षकी पेशाला सुरुवात केली. त्यानंतर मालेगाव तालुक्यातील लोणवडे, चांदवड तालुक्यातील पिंपळद त्यानंतर पुन्हा मालेगाव तालुक्यातील दहिवाळ व आता मळगाव या गावाना आईने ज्ञानदानाचे कार्य बजावले. आईने घडवलेले अनेक विद्यार्थी आज उच्च पदावर कार्यरत आहेत. 
काल (दि.२८) रोजी आम्ही सर्व कुटुंब बसलेलो असताना आईने तिच्या शाळेतील सर्व  आठवणी सांगत आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. आईने सदैव आपल्या कुटुंबाच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिली.आम्हा तिघंही भावंडाना कोणत्याच गोष्टीची कमी भासू दिली नाही. तिघा भावांचे शिक्षण, प्रपंच व आपली नोकरी  सांभाळून आई कधीच थकली नाही. आमच्या आई कडून आम्हाला नेहमीच ऊर्जा मिळत राहील. आई तू आज सेवानिवृत्त होत आहेस. तुझे यापुढचे जीवन सुखकर होवो...तुला दिर्घआयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...!

- राहूल वाघ, दसाने


ताज्या बातम्या