Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
पवारवाडी येथे कृषिदूतांचे आगमन

दि . 01/07/2019

मालेगाव : पवारवाडी (रावळगाव) येथे ग्रामीण कृषि कार्यनुभव कार्यक्रमांतगर्त धुळे येथील कृषि महविद्यालयातील कृषिदूतांचे आगमन झाल्याने त्यांचे सरपंच , उपसरपंच , सदस्य व ग्रामस्थ यांच्या वतीने स्वागत करण्यात आले .   

जुन ते ऑक्टोबर या कालावधीत कृषी दिन स्वच्छता अभियान , लसीकरण , वृक्षारोपण आदी  कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे . तसेच शेतकऱ्यांना कृषिविषयक मार्गदर्शन केले जाणार आहे . कृषिदूतांमध्ये प्रथमेश सोळ्से, ओंकार कोळी , केदार कोठाळे , विशाल चव्हाण, कुणाल सोनवणे , जावेद शेख , निखिल बनकर  यांचा समावेश आहे .

    कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक मुसमाडे, समन्वय डॉ. डी.के. देवकर सर, कार्यक्रम अधिकारी डॉ. आर. डी.चौधरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली पवारवाडी  येथे कृषीदूतांतर्फे विविध उपक्रम आगामी सहा महिन्यांत राबवले जाणार आहेत.


ताज्या बातम्या