Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
नाशिक-पंढरपूर सायकलवारीत मालेगावच्या आठ सायकलपट्टूचा सहभाग ; दिले जनजागृतीचे संदेश..   

दि . 30/06/2019

   मालेगाव:- नाशिक पंढरपूर सायकल वारीत मालेगावच्या आठ सायकल पट्टउनी सहभाग घेत स्त्री भ्रूण हत्या रोखा, बेटी बचाव बेटी पढाव, सायकल चालवा इंधन वाचवा, झाडे लावा झाडे जगवा असे  संदेश देत जनजागृती करून सायकलवारी पूर्ण केली आहे .गेल्या २८जून रोजी नाशिक येथून सायकलवारीला सुरवात झाली होती.पहिल्या दिवशी नाशिक ते नगर असे १६५ किलोमीटर चा प्रवास करण्यात आला.मुक्काम करून दुसऱ्या दिवशी नगर ते टेंभुर्णी १५० किलोमीटर व तिसऱ्या दिवशी टेंभुर्णी ते पंढरपूर ६० किलोमीटर असा ३८० किलोमीटर चा प्रवास करून पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी चरणी सायकलपट्टू नतमस्तक झाले.सायकलवारी काळात प्रवासात लागणाऱया गावात व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला.तसेच  स्त्री -भ्रूण हत्या रोखा,झाडे लावा झाडे जगवा,सायकल चालवा इंधन वाचवा बाबत जनजागृती करण्यात आली .या सायकलवारीत मालेगाव मनपाचे नगरसेवक मदन गायकवाड, सर्जेराव पवार, मुन्ना बच्छाव,दिलीप हिरे,शरद आहिरे,भरत मेहता,किरण दंडगव्हाळ,विकास मंडळ,भरत बागुल आदी सायकल पट्टू सहभागी झाले होते.


ताज्या बातम्या