Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
पार्किंगमध्ये cctv कॅमेरे नसलेल्या नामांकित हॉस्पिटलच्या पार्किंग मधून गाडीच्या डिक्कीतून साडेसात लाखांची चोरी;रुग्णालयाचे संचालकच पुरवताय चोरट्यांना रसद..

दि . 26/06/2019

हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये cctv कमेरेच नाहीत.

▪ दिवसाढवळ्या वर्दळीच्या ठिकाणच्या घटनेने नागरिकात दहशत 

▪  आठवड्यात विविध घटनात लाखोंची रक्कम लंपास; अद्याप चोरटे सापडेनात

▪ चोरट्यांचे धाडस वाढले दिवसाढवळ्या चोऱ्या: अतिशय वर्दळीच्या ठिकाणी चोरी -- 

शहरात चोरट्यांचा मुक्त वावर?  

============ ▪ पोलिसांच्या आवाहनाकडे नागरिकांचे दुर्लक्ष 

मालेगाव: गाडीच्या डिक्कीतून पैसे लांबविण्याचे व चोऱ्यांचे प्रकार आटोक्यात येत नसून चोरट्यांना पोलिसांची धास्ती उरली नसल्याचे समोर येत आहे. चोरट्यांनी एकप्रकारे पोलिसांना उघड आव्हान देत दिवसाढवळ्या भरवस्तीत रस्त्यावर चोऱ्या सुरु केल्या आहेत. आज दुपारी मालेगाव शहरातील नामांकित डॉक्टर अभय निकम यांच्या हॉस्पिटलच्या पार्किंग मधून माजी बाजार समिती सभापती भारत रायते गाडीच्या डिक्कीतून चोरट्यांनी साडेसात लाख रुपये लांबविले. हॉस्पिटलच्या पार्किंग मध्ये कॅमेरे नसल्याचं उघड .भरवस्तीत वर्दळीच्या वेळी घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

भारत रायते यांनी त्यांच्या खात्यातून देना बँकेतून काढलेले पैसे  स्वतःच्या स्कुटी गाडीत  ठेवली आणि येथुन निघून काही नातेवाईकांना रुग्णालयात भेटीसाठी गेले असता  
गाडीच्या डिक्कीतून ही रक्कम चोरण्यात आली.या संदर्भात छावणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री

▪ चोरट्यांचे धाडस वाढले दिवसाढवळ्या चोऱ्या: अतिशय वर्दळीच्या ठिकाणी चोरी -- 

▪ शहरात चोरट्यांचा मुक्त वावर? 
 ============ ▪ पोलिसांच्या आवाहनाकडे नागरिकांचे दुर्लक्ष : अनुचित घटना टाळण्यासाठी रोख रक्कम, मौल्यवान ऐवज गाडीत सोडून जाऊ नका, अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेऊ नका, बाहेरगावी जाताना पोलिसांना माहिती देऊन जा असे आवाहन वारंवार पोलिसांकडून करण्यात येत आहे. मात्र, नागरिक या आवाहनाकडे दुर्लक्ष करत आजच्या घटनेवरून सिद्ध झाले आहे. रक्कम लंपास करण्याच्या घटना वारंवार समोर येत असूनही नागरिक, व्यापारी पुरेशी काळजी घेत नसल्याने त्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.


ताज्या बातम्या