Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
सत्ताधारी पदाधिकाऱ्यांचंच अधिकारी कर्मचारी जुमानत नसतील तर सर्व साधारण जनतेचं काय ? मालेगाव पंचायत समितीची व्यथा...

दि . 26/06/2019

मासिक सभांना पदाधिकारी कायमच अनुपस्थित असल्याचा आरोप.

कार्यवाहीचा केवळ फार्स होतो,परिणाम मात्र शून्य..

पं.स. च्या मुख्य पदावर असलेल्या पदाधिकाऱ्यांकडूनच मागितला जातो जनतेकडून कामाचा मोबदला त्या बाबतीततल चित्रीकरनाचा पुरावाही मग कर्मचारी सुटत नसतील हे कशावरून..


मालेगाव तालुक्यातील जून संपत आला दुष्काळी परिस्थिती कायम आहे.दुष्काळ,पाणी टंचाई आणि खरीप आढावा घेण्यासाठी या महत्त्वाच्या विषयावर पंचायत समिती मालेगाव येथे सभापती यांनी आढावा बैठक आयोजित केली केली होती.आणि त्या बैठकीत अधिकारी अनुपस्थित असल्याने सभापतीयांनी अधिकाऱ्यां दुष्काळाचे  गांभिर्य नसल्याचे आरोप केलेत.त्यावरून सभापती यांनी बैठक तहकूब केली व अधिकारी जुमानत नसल्याचे आरोपकरत कायम अधिकारी बैठकांना अनुपस्थित असल्याचे काही सदस्य यांनी तक्रारी केल्यात.
या सर्व घटनेनंतर आमच्या प्रतिनिधींनी त्यामागील कारणं शोधण्याचा प्रयत्न केला आणि तालुक्यातील काही नागरिकांनी त्यांना काही पुरावेही दिलेत.त्या आधारावर हा ग्राउंड रिपोर्ट..
बलाबलाच्या सत्तास्थापणेनंतर मिळाले पद पण तालुक्यातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यात सभापती आणि मालेगाव पंचायत समिती सदस्यांना गाभीर्याचं नसल्याचे स्पष्ट आरोप ग्रामीण भागातून.तालुक्यातीलअनेक ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप परंतू त्यावर काहीही होत नसल्याने आता ग्रामीण जनता थेट पोहचता मुख्याधिकारी यांच्याकडे मग सरकते फाईल आणि मगच होते कार्यवाही.पण,सभापती आणि सदस्य यांनी जर वेळीच या तक्रारी स्वतःलक्ष घालून पाहिल्यास नागरिकांना न्यायासाठी जिल्हा पातळीवर का जावे लागेल.तालुक्यातील अनेक भ्रष्टाचार,विकासकामे आणि त्या संबंधित चौकशी प्रकरणे प्रलंबित असून काहीही कार्यवाही होतांना दिसत नाहीत.तर काही चौकशीच्या  तर फाईलीच गायब झाल्याच्या घटना.पदाधिकारी जर आपले काम नगरीकांच्या समस्या सोडवण्यासाठी अग्रेसर राहिले नसतील त्यांचा जर वचक नसेल तर सर्वसाधारण नागरिकांनी कोणत्या दरबारी जायचे हा प्रश्न?
ग्रामीण भागातील विकासकामांच्या संदर्भात कुणी ग्रामस्थ आलेत तर कामाचा मोबदला मागितला जातो.त्या बाबतीत काही ग्रामस्थांनी पुरावेही दिलेत.जर पदाधिकारीचं नागरिकांच्या समस्या व ग्रामविकास काम करण्याचा मोबदला मागतील तर अधिकाऱ्यांकडूनही मोबदला मागत नसतील हे कशावरून म्हणूनच अधिकारी ,कर्मचारी जुमानत नसतील.यांच्या मोबदल्याच्या नादात मालेगाव तालुक्याच्या विकास कामांचे बारा वाजले असावे.
मालेगाव पंचायतसमितीवर मासिक सभा तहकूब करण्याची नामुष्की अधिकारी अनुपस्थित असल्याने आली.


ताज्या बातम्या