Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
गेल्या २४ तासात दिवसाढवळ्या तीन चोरीच्या घटनांत मालेगावात दोन लाखांची रोकड आणि १५ ग्रॅम सोने लंपास..

दि . 25/06/2019

मालेगाव - शहरातील कॅम्प रस्त्यावरील जुने तहसील ऑफिससमोर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनातून अज्ञात चोरट्यांनी वाहनाची काच फोडून दिवसाढवळ्या २ लाख रु. लंपास केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. दाभाडी येथील फिर्यादी रोहित दशरथ निकम ( वय ३० रा. मुंजूबा चौक, दाभाडी ता. मालेगाव )हे सायंकाळच्या सुमारास आपली कार ( एम एच ४१ ए.एम.१९३८) ही रस्त्याच्या कडेला उभे करून जुने तहसील कार्यालयात स्टंप वेंडरकडे स्टंप घेण्यासाठी गेले होते. याच दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या कारच्या डाव्याबाजूकडील काच फोडून शीटजवळ २ लाख रु. रोख रक्कम असलेली पिशवी लंपास केली. फिर्यादी रोहित व मित्र गाडीजवळ आले असता हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. 
तसेच मालेगाव - शहरातील सटाणा नाका परिसरातून एका वृद्धाच्या गळ्यातील ४५ हजार रु. किंमतीची १५ ग्रेम सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. सोमवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी ७२ वर्षीय कांतीलाल हिरालाल भामरे (ह.मु.विंग प्लॉट न २०२, पारस मार्केट सटाणा नाका ) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी कांतीलाल हे सटाणा नाका परिसरात असलेल्या एका मेडिकलवर औषधे घेण्यासाठी जात होती. त्याचवेळी एका मोटारसायकलवर आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी ' बाबा आम्ही तुम्हाला शोधत आहोत. आमच्या साहेबांच्या घरी चोरी झाली आहे.'  असे म्हणून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने त्यांना काढण्यास सांगितल. व ते रुमालात बांधून देतो असे म्हणून त्या दोघांनी रुमालात बांधलेले ते दागिने लंपास करून फसवणूक केली म्हणून कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आग्रा रोडवर एका गाडीस थांबवून काही अज्ञात ईसमांनी बंदूकसदृशय हत्यार दाखवून उटण्याचा प्रयत्न केला.परंतु चालकाने समयसुचकतेमुळे चोरटे अयशस्वी झालेत आणि त्यांनी तेथून पळ काढला.किल्ला पोलीस बाबतीत अधिक तपास करीत आहेत.


ताज्या बातम्या