Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
शासकीय व राजकीय अनास्थेला कंटाळून रोंझाने-सिताने गावकर्यांनीच केला स्व खर्चाने रस्ता दुरुस्त; लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची लख्तरे वेशीला

दि . 23/06/2019

मालेगाव तालुक्यातील सायने ते रोंझाने-खलाणे-अजंदे पाडा  दरम्यानचा रस्त्याची अत्यंत दुर्दशा

विद्यार्थ्यांसाठी असलेली बसही बंद..

शासकीय आणि राजकीय अनास्थेला कंटाळून शेवटी गावकर्यांनीच केला स्व खर्चाने रस्ता दुरुस्त त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची लख्तरे वेशीला टांगली गेली. 

मालेगाव तालुक्यातील सायने ते रोंझाने-खलाणे-अजंदे पाडा  दरम्यानचा रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली असून वाहन तर सोडाच पायी चालणेदेखील त्या रस्त्यावर अवघड झाले आहे. त्या रस्त्यावरून शेकडो विधार्थ्यांना शिक्षणासाठी आणि शेतकऱ्यांना शेतीलामाल विक्री असो वा गरजेच्या वस्तू घेण्यासाठी शहरात यावे लागते. परंतु त्या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. गावकर्यांनी ह्याविषयी लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी  व  सार्वजनिक बांधकाम विभाग यांनादेखील पत्रव्यवहार केला पण त्याचा काहीही  परिणाम ,दखल तर अधिकाऱ्यांनी घेतली नाहीच पण त्या दुरवस्था झालेल्या रस्त्याकडे येऊन भेटही देण्याचे अधिकाऱ्यांना महत्वाचे वाटले नाही. 

शासकीय अधिकारी तर सोडाच पण ज्या लोकप्रतिनिधींना हे ग्रामस्थ मतदान करता त्यांनी तर मतदानानंतर या ग्रामस्थांच्या तक्रारींकडे सक्षम दुर्लक्ष केल्याच दिसते.मालेगाव तालुक्यातील हे गावं नांदगाव मतदार संघात असल्याची त्या ग्रामस्थांची चूक. कारण, त्यांच्याच तालुक्यातील राज्यमंत्री यांच्याकडेही  हि मागणी नोंदवली पण बहुतेक जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असाव असा आरोप ग्रामस्थांनी यावेळी केला. त्यांचे आमदार म्हणजे नांदगाव मतदार संघाचे आमदार पंकज भुजबळ तर फक्त मतदान घेण्याच्या वेळेसस येत. त्यांना फक्त मतदान कळते पण ग्रामस्थांच्या आणि मालेगाव ये जा करणारे शेकडो विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे होणारे नुकसान दिसतच नसावेत.  जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनाही ह्या रस्त्याची भुरळ पडली असावी. जर,राजकीय पदाधिकार्यांनाच काही घेणेदेणे नाही तर शासकीय अधिकाऱ्यांनी का आपले कर्तव्य दाखवतील हाही प्रश्नच आहे.

सर्वीकडे तक्रारी करूनही शासकीय आणि राजकीय लोकांनी सपसेल  दुर्लक्ष केल्याने त्याच रस्त्यावर विद्यार्थी शाळेपर्यंत ने आन करणाऱ्या परिवहन विभागानेही आपली बस बंद केली. या अनास्थेमुळे शालेय विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद पडू नये म्ह्णून शेवटी ग्रामस्थ आणि एसटी च्या अपेक्षत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनीच स्वखर्चाने रस्ता दुरुस्त केला.

त्यामुळे गावकरी आणि आणि विद्यार्थ्यांची संतप्त प्रतिक्रिया उमटत असून अतिशय तिखट शब्दात प्रतिक्रिया दिल्या गेल्याने लोकप्रतिनिधी आणि सुप्त अवस्थेत गेलेले अधिकारी यांचे लख्खरे वेशीला टांगली गेली. 
 


ताज्या बातम्या