Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
सोमवार बाजार व्यापारी संकुलासंदर्भात केलेल्या आंदोलनाची घेतली दखल; मनपा मांडणार महासभेत प्रस्ताव..

दि . 21/06/2019

मालेगाव : कॅम्प भागातील सोमावर बाजार व्यापारी संकुलातील गाळे व बाजार ओटे अवंटीत करून व्यवसायासाठी खुले करावे या मागणीसाठी आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती तर्फे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. 

          मालेगाव महानगर पालिकेच्या वतीने कॅम्प सोमवार बाजार येथे व्यापारी संकुल उभारण्यात आले आहे. सोमवार बाजार हे पूर्वी संपूर्ण कॅम्प भागातील व्यापारी केंद्र म्हणून बघितले जात होते. त्यावेळी स्थानिकांना रोजगार व व्यापार चांगल्या प्रकारे सुरू होता. मालेगाव महानगर पालिकेच्या वतीने या सोमवार बाजारात केंद्र सरकारच्या एकात्मिक विकास योजनेअंतर्गत निधीतून व्यापारी संकुल बांधण्याचा निर्णय घेतला गेला. त्यानुसार व्यापारी संकुल उभारण्यात येऊन आज जवळ जवळ १० वर्षे होत आली आहेत. परंतु महानगर पालिकेच्या वेळकाढू धोरणामुळे आज हे व्यापारी संकुल दारू पिण्याचा व अस्वच्छतेचा अड्डा बनला आहे. याच्या निषेधार्थ आंदोलनात कॅम्पातील सर्व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

              व्यापारी संकुलातील गाळे व ओटे व्यवसायासाठी उपलब्ध करून दिल्यास संपूर्ण परिसरास गत वैभव प्राप्त होऊ शकते. रस्त्यांवरील वाहतूक कोंडी व अपघात रोखण्यासाठी मदत होऊ शकते. कॅम्प परिसराच्या सोयीसुविधांमध्ये वाढ होऊन नियोजन बद्ध विकास करण्यास मदत होईल. रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. परिसरातील व्यवसायात वाढ होईल. यावेळी माजी नगरसेवक रवींद्र पवार यांनी व्यापारी संकुलाचा इतिहास मांडला. स्थानिक नागरिक व व्यापारी यांनी आपल्या भावना व्यक्त करत आंदोलनास पाठिंबा सक्रिय दिला.
सहाय्यक आयुक्त कर यांनी आंदोलन स्थळी भेट देवून मनपा अधिनियमात मालमत्ता भाड़ेतत्वावर ११ महिन्याचा देण्याची तरतूद असून तो कालावधी ११ वर्ष करण्यासाठी महासभेच्या मान्यतेस प्रस्ताव सादर करावयाचा असून उपोषण मागे घ्यावे अशी विनंती केली. त्यावर समिति तर्फे दिलेल्या अश्वासनावर समाधान न झाल्याने दिनांक १५ जुलै २०१९ पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला.
            आंदोलनात निखिल पवार , देवा पाटील,  सुशांत कुलकर्णी, प्रा.के.एन. आहिरे, विवेक वारुळे, शेखर पगार , यशवंत खैरणार, बंडू माहेश्वरी, संजय जोशी, किशोर काळुंखे, प्रदीप पहाडे, माजी नगरसेवक दिलीप पवार, रवींद्र पवार, 
मारुती शिंदे, शरद खैरणार, विनोद चव्हाण, भारत रायते, विशाल पवार, सनी काळे , राकेश जगताप , गणेश मोरे, शुभम जगताप, चेतन बिर्ला, रामू पवार, विजू गवळी, अतुल लोढा, शिवाजी जगताप, कृष्ण कुलकर्णी, राजू साळुंके, रमेश उचित, लिंब गुंजाळ, तुषार जगताप, दीपक भोसले, सतीश कलनत्री, कैलास कोठावदे, दुर्गेश अग्रवाल, गणेश गुंजाळ, रवी पाटील, राजेंद्र सोनार, कपिल डांगचे, दिनेश बोरुडे, तुषार जगताप, योगेश भडांगे आदि उपस्थित होते.


ताज्या बातम्या