Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
पदवी अभ्यासक्रम प्रवेशप्रक्रियेतील कागदपत्र पडताळणीला मुदतवाढ द्यावी-राकेश भामरे

दि . 20/06/2019

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2019-20 या वर्षाकरीता प्रथम वर्ष पदवी (इए/इ. ढशलह/इ.कचउढ/इ.झकअठच/इ.अठउक) प्रवेशप्रक्रियेची कार्यवाही सुरू झाली आहे. त्याअंतर्गत केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन नोंदणी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांच्या मूळ कागदपत्रांच्या तपासणीसाठी दि. 19 जून 2019 पासून प्रारंभ झाला. त्यासाठी सेतू केंद्रावर व्यवस्था करण्यात आली असली तरी, बुधवारी (दि. 19) बहुतांश केंद्रावर कागदपत्रांची पडताळणी होऊच शकली नाही. केंद्रांतर्फे सर्वर डाऊन असल्याचे सांगण्यात आले. याविषयी नाशिक जिल्हा समन्वयक श्री. अमोल औटी यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन चर्चा केली असता, त्यांनीही सर्वरचेच कारण देत लवकरच सेवा सुरळीत करण्याची ग्वाही दिली. त्यानंतरही बुधवारी सायंकाळी पाचवाजेपर्यंत देखील सेवा सुरळित न झाल्याने शेकडो विद्यार्थी व पालकांना पडताळणीविनाच माघारी फिरावे लागले. त्यामुळे वेळ व पैसा या दोन्हींचा अपव्यय झाला. 
दरम्यान, कागदपत्र पडताळणीशिवाय विद्यार्थ्यांना अपेक्षित प्रवेशच मिळणार नसल्याचे स्पष्ट आहे. या प्रक्रियेसाठी दि. 21 जून 2019 च्या सायंकाळी पाच वाजेपर्यंतच मुदत आहे. प्रत्येक सेतू केंद्रावर किमान पाचशे विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. एका विद्यार्थ्यांच्या तपासणीसाठी किमान एक तास अवधी लागत आहे. विद्यार्थी संख्या व उपलब्ध अवधी पाहता दि. 21 जूनपर्यंत सर्व विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण होणे प्रस्तुत परिस्थिती अशक्यप्राय बाब झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी कागदपत्र पडताळणीची मुदत किमान तीन ते चार दिवस वाढविण्यात यावी. त्याचबरोबर सर्वरची समस्या निकाली काढण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला देण्यात यावे, शिक्षण विभागाने तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी मनसेतर्फे करण्यात आली व आदेश न काढल्यास विद्यार्थ्यांचे आंदोलन छेडण्यात येईल.यावेळी
श्री. राकेश भामरे.शहराध्यक्ष, मनसे मालेगाव.,किशोर गवळी,प्रवीण सोनावणे, गणेश पवार, गोकुळ सोनार,भरत सूर्यवंशी, मोहसीन शेख,अविनाश बच्छाव आदी मनसे चे पदाधिकारी उपस्थित होते.


ताज्या बातम्या