Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
घरगुती वादातून आई-मुलाची आत्महत्या; नांदगावच्या जळगाव खुर्द गावातील घटना

दि . 20/06/2019

किरकोळ कारणावरून आई आणि मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आई आणि तरुण मुलामध्ये झालेल्या वादातून रागाच्या भरात दोघांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना नांदगांवच्या जळगाव खुर्द गावात घडली आहे.

मंदाबाई सरोदे (५५) व गणेश सरोदे (३०) अशी मृत मायलेकांची नावे आहेत. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. जेवण बनविण्याच्या कारणावरून दोघा मायलेकात वाद झाला. त्यातून गणेशने आणि त्यापाठोपाठ त्याच्या आईनेही विष प्राशन केले. दोघांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.


ताज्या बातम्या