Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगाव तालुक्यात एकाच रात्री झाल्यात दहा घरफोड्या; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह..

दि . 20/06/2019

मालेगाव तालुक्यातील टेहरे, पाटणे,ब्रम्हणगाव या गावांमध्ये एकाच रात्रीतून दहा पेक्षा अधिक झाल्या घरफोड्या.या घरफोड्या मध्ये , ५ ते ६ लाखांचे सोनं आणि एक लाखांची रोकड चोरीला.नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या गावांमध्ये मध्यरात्रीनंतर  दरोडेखोरांनी  घराचे कुलुप तोडून घर व दुकानांचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.कपाटात आणि तिजोरीमध्ये असलेले सोन्याचे दागिने व रोकड लंपास केली.
प्रत्यक्ष दर्शी महिलेने सांगितले की तीन मोटार सायकलवरून सहा लोक तोंडाला कपडे बांधून हातात लोखंडी रॉड घेऊन कुलूप तोडत होते. पोलिसांनी फॉरेन्सिक टीम आणि स्वान पथकाला पाचारण करून cctv फुटेज च्या मदतीने चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.   वारंवार  दरोड्याच्या घटना घडत असल्याने ग्रामीण भागात दहशतीचे वातावरण पसरले आहे. 
वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांनी मालेगाव पोलीस दलाचा नाकर्तेपणा उघडकीस आला आहे.चोरट्यांवर वचक नसल्याने पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेवर नागीकानी  प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.


ताज्या बातम्या