Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
सरदार मार्केट परिसरातील अतिक्रमण हटविले, एसआरपीच्या चाैकीवरही हाताेडा ..

दि . 19/06/2019

मालेगाव महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने मंगळवारी (दि. १८) सरदार मार्केट परिसरातील अतिक्रमण हटविले. राज्य राखीव पाेलिस दलासाठी (एसअारपी) बनविण्यात अालेल्या पत्र्याच्या चाैकीवरही हाताेडा मारण्यात अाला. 
सामाजिक कार्यकर्ते रामदास बाेरसे यांनी या भागातील अतिक्रमण हटविण्याची मागणी महापालिका अायुक्तांकडे केली हाेती. वाढत्या अतिक्रमणांमुळे मूळ रस्ते अरुंद हाेऊन नागरिकांना पायी चालणेही अवघड झाले हाेते. हातगाड्या, भाजी विक्रेते, रिक्षाचालकांची बेशिस्त पार्किंग यामुळे अतिक्रमणात भर पडली हाेती. महापालिकेच्या नकाशावरील मूळ रस्ताच चाेरीला गेल्याचा अाराेप बाेरसे यांनी केला हाेता. १८ जूनपर्यंत अतिक्रमण न हटविल्यास घंटानाद अांदाेलनाचा इशारा दिला हाेता. त्यामुळे प्रभाग अधिकारी किशाेर गिडगे, राजू खैरनार, दीपक हातगे हे कर्मचाऱ्यांसह दुपारी मार्केटमध्ये दाखल झाले. त्यांनी बंद अवस्थेत पडून असलेली रुग्णवाहिका हटवून पाेलिस चाैकीचे शेड ताेडून जागा माेकळी केली. 


पाेलिस कर्मचाऱ्यांची गैरसाेय 
शहराची संवेदनशीलता लक्षात घेता या भागात राज्य राखीव दल चाेवीस तास तैनात असते. रस्त्याच्या मध्यभागी तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या चाैकीत बसून कर्मचारी बंदाेबस्त ठेवत हाेते. मात्र, चाैकी हटविली गेल्याने या कर्मचाऱ्यांची गैरसाेय झाली अाहे.


ताज्या बातम्या